French, asked by aasthakhobragade04, 1 month ago

खेळ खेळताना साधारणपणे कोणत्या दुखापती होतात? त्यापैकी कोणत्याही एका दुखापती वर कसा प्रथमोपचार करता येईल ते लिहा.​

Answers

Answered by salonikhandarkar24
20

Answer:

Homepageसाप्ताहिकमजेत मस्त तंदुरुस्त

vinayak sarvanje

2 years ago

मैदानी खेळ आणि शारीरिक दुखापती

डॉ. अजित बावीस्कर

मैदानांवर होणा-या निम्म्याहून अधिक दुखापतींमध्ये फॅ्रक्चर, मुका मार किंवा खरचटण्यांचा समावेश असतो. गंभीर स्वरूपाच्या नसलेल्या ७५% दुखापती सार्वजनिक मैदानांमध्ये होतात. त्यापैकी बहुतेक दुखापती शाळेतील मैदानांवर होताना दिसतात.

अलीकडच्या काळात मैदानात होणा-या अपघातांमुळे मेंदूला होणा-या दुखापतींमध्ये खूप वाढ झाली आहे.

मैदानात कधीही दुखापत होऊ शकते. ती दुखापत सौम्य असली किंवा गंभीर असली तरी त्याला कसे हाताळता हे खूप महत्त्वाचे असते. रक्तस्रव, धक्का, भाजणे, डोळ्यांना किंवा नाकाला झालेली इजा, प्राणी व किडय़ांनी केलेला दंश, फ्रॅक्चर, लचकणे, मुरगळणे, निखळणे, विषबाधा, आकडी येणे आणि तीव्र वातावरणामुळे होणा-या इजा व आजार यावर प्रथमोपचार करणे आवश्यक असते.

पीडित व्यक्ती बेशुद्ध पडली, त्या व्यक्तीला झालेली जखम किंवा दुखापतीचा प्रकार यांच्याशी संबंधित नसलेली वेदना होत असेल, तर वैद्यकीय मदत मागवावी.

जंतुसंसर्ग टाळण्यासाठी अशा व्यक्तींना हाताळताना हात स्वच्छ असावेत.

पडणे : खेळताना किंवा व्यायाम करताना एखादी व्यक्ती पडू शकते, पकड निसटते किंवा तोल जातो. अशा वेळी तुमचा प्रथमोपचाराचा डबा सोबत असावा. त्यात असलेल्या आवश्यक औषधांचा, स्प्रेचा उपयोग करून सौम्य स्वरूपाच्या इजांवर उपचार करता येऊ शकतात.

रक्तस्राव : हा बहुधा सौम्य प्रकारचा असतो, पण मोठय़ा शिरेला किंवा रक्तवाहिनीला इजा झाली असेल तर हा प्रकार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. असे झाल्यास जखम होणे, जखमेत एखादी बाह्यवस्तू चिकटलेली असणे किंवा नसणे आणि जखमेच्या भागात वेदना होणे, कापणे किंवा त्वचेचा रंग जाणे, इजा झालेल्या भागाचे कार्य न होणे ही लक्षणे असतात. अशा वेळी एक स्वच्छ र्निजतुक कापडाचा तुकडा जखमेच्या भागावर दाबा. जखम बांधण्यासाठी बँडेजचा वापर करा. रक्तस्रव थांबत नसेल किंवा अति प्रमाणात होत असेल, तर वैद्यकीय मदत मागवा.

नाकातून रक्त येणे : नाकात अनेक नाजूक रक्तवाहिन्या असतात. तुम्ही पडलात, तर त्या सहज फुटू शकतात आणि त्यातून रक्त येऊ शकते. अशा वेळी बसून राहा आणि डोके थोडेसे पुढे करा. शांत होण्याचा प्रयत्न करा. अंगठा आणि तर्जनीने नाकाच्या हाडाच्या खालचा मऊ भाग घट्ट धरून ठेवा आणि तोंडाने श्वासोच्छ्वास करा. रक्त थांबत नसेल, तर हातरुमाल किंवा टॉवेल थंड पाण्याने ओला करा, पिळा आणि नाकावर आणि गालावर दाबून धरा. नाक शिंकरू नका किंवा पुढील काही तास खपली काढू नका. कारण तसे केल्यास पुन्हा रक्तस्रव सुरू होईल. इतके करूनही रक्त येण्याचे थांबले नाही तर लगेच डॉक्टरचा सल्ला घ्या.

कापणे आणि खरचटणे : मैदानावर जाताना घेण्याच्या प्रथमोपचाराच्या डब्यामध्ये बँडेज समाविष्ट असलेच पाहिजे. तसेच, तुमच्या कीटमध्ये कापसाचा तुकडा आणि स्पिरीटची बाटली जवळ असावी. मैदानी खेळ खेळताना कापल्यास किंवा खरचटल्यास ती जखम लवकर बरी होण्यासाठी स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे असते. असे केल्याने जंतुसंसर्गही होत नाही. त्याचप्रमाणे खोल जखमा स्वच्छ करण्यासाठी अँटिसेप्टिक वॉशही सोबत असावे. जखम स्वच्छ केल्यानंतर त्यावर अँटि-बॅक्टेरिअल क्रीम, जेल किंवा स्प्रे लावावा. जखम खोल असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांना जखम दाखवावी. हॉस्पिटलमध्ये जाऊन टाके घालून घेतले, तर जखम बरी होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होऊ शकेल.

भाजणे, चावा, दंश आणि अ‍ॅलर्जी : उन्हामुळे पोळणे, किडय़ांचा दंश, चावा किंवा एखाद्या विशिष्ट वातावरणात होणा-या अ‍ॅलर्जीमुळे आजार होणे सर्रास घडत असते. प्रथमोपचाराच्या डब्यातील औषधांमध्ये साध्या भाजण्यासाठी मलम किंवा स्प्रे असावा. मैदानावर आग लागण्याची शक्यता कमी असली तरी धातूच्या पट्टय़ा किंवा हँडल्स दिवसभर उन्हात असतात आणि खूप गरम होऊ शकतात. ऊन असेल तर सनबर्न म्हणजेच त्वचा पोळण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून सनस्क्रीन वापरावे आणि वाहते पाणी व कोरफडीचा उपचारासाठी वापर करावा. एखाद्या किडय़ाने चावा घेतल्यास वा दंश केल्यास त्यावर उपचार म्हणून एखादे क्रीम तुमच्या प्रथमोपचाराच्या डब्यात असावे. मधमाश्या, आग्या मुंग्या, डास आणि गोचीड मैदानावर सर्रास आढळतात. त्यामुळे त्यांच्यापासून संरक्षण करणे आवश्यक असते. डोळे चुरचुरणे, नाक वाहणे आणि इतर गंभीर प्रतिक्रियांसाठी तुमच्या डब्यात मॉइश्चरायझर, नेझल स्प्रे असावेत.

हृदयविकाराचा झटका : मैदानावर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, तर कार्डिओपल्मनरी रिसुसिटेशन (सीपीआर) हे तंत्र अवलंबावे. हृदयविकाराचा झटका किंवा श्वासोच्छ्वास वा हृदयाचे ठोके थांबल्यास जीव वाचविण्यास हे तंत्र उपयोगी पडू शकते. अर्हताप्राप्त वैद्यकीय तज्ज्ञांकडून तुम्ही सीपीआर तंत्र शिकून घ्यावे.

हाड मोडणे : मैदानी खेळ खेळताना हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. फटका बसल्यावर विशिष्ट आवाज येणे, सूज येणे, कापणे, हालचाल करताना वेदना होणे किंवा स्पर्श केल्यावर वेदना होणे ही याची लक्षणे आहेत. अशा वेळी बर्फ लावावा आणि तुम्ही तो अवयव हलवू नका, स्थिर ठेवा आणि डॉक्टरची भेट घ्या.

लचकणे : मैदानावर सर्रास घडणारा हा प्रसंग आहे. त्यामुळे विश्रांती घ्या, बर्फ लावा, दाबून ठेवा आणि उचलून ठेवा. बर्फ लावताना तो २० मिनिटे लावा, २० मिनिटे लावू नका अशा पद्धतीने ही कृती करा. घोटय़ाला एस बँडेज लावा जेणेकरून त्वचेचे रक्षण होईल आणि सूज कमी होईल. तो अवयव वरच्या दिशेने ठेवा आणि त्या भागाला आराम द्या.

Similar questions