World Languages, asked by salonikhandarkar24, 1 month ago

खेळ खेळताना साधारणपणे कोणत्या दुखापती होतात ? त्यापैकी कोणत्याही एका दुखापतीवर कसा प्रथमोपचार करता येईल ते लिहा​

Answers

Answered by amrutaphadtare2006
23

Answer:

गुडघ्याला लागणे ,पायाला खरचटणे ,काडी कधी तर मोठी दुखापत होणे इत्यादी .

प्रथमोपचार म्हणजे जर आपल्याकडे जर कापूस आणि डेटॉल किंवा आणखी काहीतरी असेल तर त्याने आपण आपली दुखापत प्रथमोपचार म्हणून तात्पुरती बारी करू शकतो .

एक्सप्लेनेशन =

Answered by rajraaz85
8

Answer:

खेळ खेळणे हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ खेळणे हे आवश्यक असते. कुठलाही मैदानी खेळ खेळत असताना त्याचा शरीराला फायदा होतो.

जेव्हा खेळाडू मैदानामध्ये खेळ खेळत असतात त्यावेळेस त्यांना अनेक प्रकारच्या दुखापती होण्याची शक्यता असते. खेळत असताना खेळाडू जमिनीवर कोसळतात व त्यामुळे त्यांच्या पायांना इजा होण्याची शक्यता असते. कधी कधी पायाला हाताला डोक्याला किंवा शरीराला खरचटले जाते, तर कधी जखमा होतात, कधी हात किंवा पाय मोडण्याची देखील शक्यता असते.

ज्यावेळेस मैदानामध्ये खेळाडूला असे काही लागते त्या वेळेस आपण थोड्या प्रमाणात प्रथमोपचार करू शकतो.

  • जर एखाद्या व्यक्तीला जखम झाली असेल तर सर्वात अगोदर ती जखम स्वच्छ पाण्याने धुतली पाहिजे.

  • त्यानंतर त्या जखमेवरती अँटी सेप्टीक औषधाचा वापर केला पाहिजे. जखम निर्जंतुक झाल्यानंतर त्या जखमेवर ती जखम बरी होण्याचे पावडर किंवा मलम लावला पाहिजे.

  • कापूस आणि मलम लावल्यानंतर त्या जखमेला व्यवस्थित रीतीने बांधले पाहिजे.

Similar questions