खेळांतून व्यावसायिक संधी कशा प्राप्त होतात ?
Answers
Explanation:
क्रीडा व्यवस्थापन या विषयाशी संबंधित तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. या संबंधित अभ्यासक्रम, हा प्रशिक्षणक्रम उपलब्ध असलेल्या शिक्षणसंस्था आणि या क्षेत्रातील करिअर संधी याविषयी सविस्तर माहिती–
ज गभरातील क्रीडा क्षेत्राचा परीघ विस्तारत असून त्यात भारताचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे. क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक घडामोडी घडताना दिसतात. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर म्हणजेच जिल्हा, तालुका, स्तरावरही खेळांविषयीची जागरूकता वाढलेली दिसून येते.
ठिकठिकाणी सर्व वयोगटांसाठी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धा, सायकिलग स्पर्धा, ठिकठिकाणी सुरू झालेल्या व्यायामशाळा, मैदानी खेळांचे प्रशिक्षणवर्ग, पंचतारांकित हॉटेल्समधील क्रीडा/ व्यायामविषयक सुविधा, मोठय़ा शहरांत वाढणाऱ्या ‘रिक्रिएशनल क्लब्ज’ची संख्या, यावरून खेळ आणि त्याद्वारे फिटनेस आणि मनोरंजनाकडे जनसामान्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते. कदाचित यामागे उंचावलेले जीवनमान, वाढते शहरीकरण आणि आरोग्याबाबतची जागरूकता ही कारणेही असू शकतील.
कोणताही क्रीडा उपक्रम पार पडण्यासाठी जसा उत्तम खेळाडूंचा सहभाग अत्यावश्यक असतो, त्याचप्रमाणे उपक्रमाची जागा निश्चिती, क्रीडासामग्रीची उपलब्धता, परीक्षक-क्रीडा प्रशिक्षकांची नेमणूक, खेळाडूंचे खानपान, सुरक्षा, निवास, प्रवास आदींचे आयोजन आणि खर्चाची तरतूद याकरता अर्थनियोजन अशा गोष्टींची पूर्तता तितकीच महत्त्वाची ठरते.