खानदेशातील नारायण व्यासांचे जन्मगाव कोणते ते सांगा
Answers
नारायणराव व्यासांचा जन्म इ.स. १९०२ मध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर येथे संगीत उपासकांच्या कुटुंबात झाला.
Answer:
कोल्हापूर
Explanation:
१. नारायणराव व्यासांचा जन्म इ.स. १९०२ मध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर येथे झाला. ते संगीत उपासकांच्या कुटुंबात जन्माला आले. त्यांचे वडील, काका हे कोल्हापुरात संगीत क्षेत्रात नावाजलेले संगीतकार होते. विख्यात संगीतकार व गायक शंकरराव व्यास हे नारायणरावांचे मोठे भाऊ होते.
२. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी लाहोर येथे विष्णू दिगंबर पलुसकर यांनी सुरू केलेल्या गंधर्व महाविद्यालयात 'गुरुकुल' पद्धतीत संगीत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिथे त्यांचे थोरले बंधूही संगीत शिकत होते. इ.स. १९२२ मध्ये आपले संगीत शिक्षण संपवून दोन्ही बंधू अमदावाद येथे गंधर्व महाविद्यालयाच्या स्थानिक शाखेत संगीत शिकवू लागले.
३. ख्याल, भजन व ठुमरी या गायन प्रकारांमध्ये ते विशेष प्रसिद्ध होते.