खोद आणखी थोडेसे या कवितेचा विषय
Answers
Answer:
खोद आणखी थोडेसे ही आसावरी काकडे यांची सुंदर कविता आहे. कवितेच्या माध्यमातून कवयित्री सतत प्रयत्न करण्याची व प्रत्येक संकटाची चिकाटीने लढण्याची जिद्द लोकांमध्ये उत्पन्न करतात.
कुठलेही गोष्ट करत असताना अगदी मेहनतीने व एकाग्रतेने प्रयत्न केले तर कूठलीही गोष्ट अशक्य नाही. माती खोदली तर झरा लागणारच असे कवयित्री म्हणतात.
स्वतःचा आत्मविश्वास आणि आतील तळमळ यांच्या जोरावर व्यक्ती अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. प्रामाणिकपणा आणि त्यासाठी लागणारी चिकाटी जर असेल तर यश हे नक्की मिळते.
Answer:
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
( खोद आणखी थोडेसे )
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (१)
2. प्रस्तुत कवितेचा विषय ( १ )
3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)
Explanation:
1. कवयित्री - आसावरी काकडे
2. प्रयत्नवाद व सकारात्मकता ही मूल्ये रुजवणे हा प्रस्तुत कवितेचा विषय आहे.
3. 'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून कवयित्री आपल्या मनावर सकारात्मकता व प्रयत्नवाद या मूल्यांचा संस्कार उमटवते. याकरता ती खोदण्याच्या क्रियेचे, झऱ्याचे समर्पक उदाहरण देते. कमीत कमी शब्दांत अर्थपूर्ण आशय व्यक्त करण्याचे कवयित्रीचे कौशल्य मनाला भावते. छोट्या छोट्या काव्यपंक्ती वाचताना कविता नादमधुर वाटते. कविता अष्टाक्षरी छंदात म्हणजेच प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असून, प्रत्येक कडव्यातील दुसऱ्या व चौथ्या ओळींत यमक गुंफलेली आहेत. कवितेत एक आंतरिक लय निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे, ती गाता येते. या सर्व कारणांमुळे ही कविता मला फार आवडते.