India Languages, asked by sumitvishwaka91, 1 day ago

खरेखोटे' या शब्दाचा समास ओळखा * वैकल्पिक द्वंद्व समास समाहार द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास अव्ययीभिव समास​

Answers

Answered by MathCracker
12

प्रश्न :-

खरेखोटे' या शब्दाचा समास ओळखा *

वैकल्पिक द्वंद्व समास

समाहार द्वंद्व समास

इतरेतर द्वंद्व समास

अव्ययीभिव समास

उत्तर :-

  • (१) वैकल्पिक द्वंद्व समास

अधिक जाणून घ्या :-

समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

1. अव्ययीभाव समास

2. तत्पुरुष समास

3. द्वंद्व समास

4. बहुव्रीही समास

_______________________________

1. अव्ययीभाव समास :-

ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.

उदा.

  • गावोगाव– प्रत्येक गावात
  • गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत

2. तत्पुरुष समास :-

ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.

उदा.

  • महामानव – महान असलेला मानव
  • राजपुत्र – राजाचा पुत्र

3) द्वंद्व समास :

ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘‘द्वंद्व समास’ असे म्हणतात.

उदा.

  • रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
  • विटीदांडू – विटी आणि दांडू

4) बहुव्रीही समास :

ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

उदा.

  • नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
  • वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती) \:

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Similar questions