India Languages, asked by heenakhan8779, 1 year ago

खरी सुंदरता कहाणी मराठी भाषा​

Answers

Answered by cdarshana760
2

Answer:

खरी सुंदरता

एकदा बादशहा अकबरची पत्नी जोधा बेगम आणि अकबरच्या दरबारातील नर्तकी उर्वशी यांच्यामध्ये त्या दोघांपैकी जास्त सुंदर कोण यावर वादविवाद झाला . दोघींमधला वाद एवढ्या शिगेला पोहचला कि ते प्रकरण अकबर पर्यंत येऊन पोहचल . जोधा बेगम आणि उर्वशी दोघी अकबरला विचारू लागल्या कि सर्वात सुंदर कोण ?आता मात्र अकबरने शिताफीने हा प्रश्न बिरबलवर ढकलला . बिरबल अगोदरच हुशार , त्याने चार लहान मुल शोधून आणाली आणि राणीला त्यातील एक मुल निवडायला सांगितले . राणीने त्यातील सर्वात सुंदर मुल निवडले . नंतर बिरबलने उर्वशीला एक मुल निवडाला सांगितले , उर्वशीनेही सर्वांत सुंदर मुल निवडले . मग बिरबल म्हणाला १० तास या मुलांना तुम्हाला वागवायचे आहे मग हि मुलेच सांगतील सर्वात सुंदर कोण . ठरल्याप्रमाणे दोघी नी मुलांना वागवले .१० तासांनंतर मुलांना घेऊन त्या दरबारात आल्या . मग बिरबल ने विचारले कि या सुंदर मुलांसोबत चा अनुभव कसा राहिला . तेव्हा दोघी कंटाळून म्हणाल्या कि , हि मुल सुंदर होती परंतु त्यांनी आम्हाला खुप त्रास दिला , म्हणून यांची सुंदरता काहीच कामाची नाही . मग यावर बिरबल हसून म्हणाला , ' ' हि मुल शारिरीक सुंदर होते म्हणून तुम्ही त्यांना निवडले परंतु , जेव्हा तुम्हाला त्यांच्या स्वभावाचा त्रास झाला तेव्हा तुम्हाला त्याची सुंदरता नकोशी वाटू लागली . तुम्ही दोघांना यावरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेलच मनाची सुंदरता हिच खरी सुंदरता ." या उत्तराने दोघींचे समाधान झाले आणि त्यांना उमगले की , ' ज्याचे मन सुंदर त्याचे सर्वच सुंदर . '

जर तुम्हाला हे उत्तर उपयोगी ठरले असेल तर कृपया या ला brainalist म्हणून मार्क करा .

Similar questions