Khel kheltana sadharnpane kontya dukhapati hotat
Answers
Explanation:
खेळताना होणाऱ्या अपघातांमध्ये प्रामुख्याने गुडघ्यांशी संबंधित दुखापती आढळून येतात. यात पुढील प्रकारांचा समावेश असतो :
ऍन्टेरिअर क्रुशिएट लिगामेन्ट फाटणे.
गुडघ्याच्या सांध्याच्या आत असलेला गुडघ्याला स्थिरता देणारा एक महत्त्वाचा घटक आहे. यात बरेचदा रुग्णाचा पाय मुरगळतो व त्यानंतर गुडघ्याला हलकीशी सूज येते. रुग्णाला नीट चालता येत नाही. या दुखण्याचे निदान तपासणी किंवा एमआरआय स्कॅनद्वारे करता येते. अशा दुखापतींवर सूज ओसरल्यानंतर लगेचच करण्यात येणाऱ्या कीहोल आथ्रेस्कोपिक सर्जरीद्वारे उपचार होऊ शकतो.
मेनिस्कल टेअर
मेनिस्कल टेअर हा प्रकार दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळून येणारा प्रकार आहे, जो ऍन्टेरिअर क्रुशिएट लिगामेन्टच्या साथीने किंवा स्वतंत्रपणेही उद्भवू शकतो.
मेनिस्कस म्हणजे गुडघ्यातील हाडांच्या पृष्ठभागांमध्ये असलेले कुर्चेचे अर्धचंद्राकृती कुशन. हे कुशन एकदा फाटले की, गुडघा वाकवताना सतत खोल दुखत राहते. ही दुखापत बहुतेकता आथ्रेस्कोपिक कीहोल डे सर्जरी प्रक्रियेद्वारे बरी करता येते.
मीडिअल कोलॅटरल लिगामेन्ट ताणले जाणे.
अशी स्थिती म्हणजे गुडघ्याच्या सांध्याबाहेर आडव्या रेषेत असणारे अस्थिबंध ताणले जाणे. हे अस्थिबंध गुडघ्याच्या आतील बाजूस स्थिरता देतात. हा एक अत्यंत महत्त्वाचे स्थैर्यदायी घटक आहे. या प्रकाराच्या बहुतांश दुखापती सौम्य स्वरूपाच्या असतात व कोणत्याही प्रकारचे ब्रेसिंग किंवा सर्जरीविनाही त्यावर उपचार होऊ शकतो.
पॅटेलोफेमोरेल स्ट्रेन
पॅटेलोफेमोरेल स्ट्रेनमुळे बसलेल्या अवस्थेतून उठण्याचा प्रयत्न करताना किंवा पायऱ्या चढताना वेदना होतात. बहुतेकदा पॅटेला (गुडघ्याच्या वाटीवरील हाड) आणि मांडीचे हाड यांच्यामध्ये आत्यंतिक ताण निर्माण झाल्याने असे होते. अशा प्रकारचे दुखणे औषधोपचार आणि योग्य व्यायामाद्वारे बरे होऊ शकते. बरेचदा गुडघ्याच्या सांध्यातील स्नायूंमधील समतोल डळमळीत झाल्यास हे दुखणे उद्भवते.
अँकल स्ट्रेन
अँकल स्ट्रेन, विशेषत: घोट्याजवळचा भाग बाहेरच्या बाजूने मुरगळणे ही सर्वसामान्यपणे आढळून येणारी दुखापत आहे. बऱ्याचशा प्रकरणांमध्ये औषधे आणि वेळीच केलेल्या व्यायामाने ही समस्या सुटते. अगदी क्वचितप्रसंगी, घोट्याची हालचाल खूपच काळ अस्थिर राहिल्यास, ती बरोबर करण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.
हॅमस्ट्रिंग पूल
हॅमस्ट्रिंग पूल किंवा इतर स्नायू किंवा स्नायूबंधांशी निगडित दुखापती वरचेवर पाहायला मिळतात आणि त्यामुळे दुखापतीच्या जागी वेदना होत राहते. यामुळे क्रीडापटूला दुखरा स्नायू किंवा स्नायूबंध पूर्णपणे ताणता येत नाही. औषधे आणि फिजिओथेरपीद्वारे हे दुखणे बरे होऊ शकते.
खांद्याचे हाड सरकणे
यात खांद्याचा सांधा खुब्यांमधून निखळतो. काही वेळा, काही व्यक्तींच्या बाबतीत हे वारंवारही घडते. अतिशय गंभीर स्थितीमध्ये हा सांधा छोटा करून झोळीत अडकवावा लागतो. एकदा का दुखापत बरी झाली की, खांद्याला व्यायाम दिला जातो. हे पुन्हा घडल्यास उतींची स्थिती पाहून कीहोल किंवा ओपन सर्जरीद्वारे उपचार करता येतात.
दुखापतींच्या या सर्व प्रकारांबरोबरच पेशंटला एखाद्या अवयवयाच्या अतिवापरामुळे उद्भवणाऱ्या या प्रकारातील दुखापती होऊ शकतात. उदा. टेनिस एल्बो, जंपर्स नी, इलोटिबियल बॅंड सिंड्रोम, शिन स्प्लिन्ट्स इत्यादी. बरेचदा चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्याने या तक्रारी उद्भवतात.
खेळताना मोठी दुखापत झाल्याने फ्रॅक्चर्स होऊ शकतात. अशा दुखापती मुलगा, मुलगी दोघांनाही होऊ शकतात, पण मुलांमध्ये त्याची शक्यता अधिक असते. कारण, खेळात सहभागी होण्याचे त्यांचे प्रमाण जास्त आहे. मात्र, आपल्या देशात हे चित्र आता झपाट्याने बदलू लागले आहे.