India Languages, asked by sonamchauhan7076, 1 year ago

kirkol vyapari mulakhat ahaval

Answers

Answered by navadeep7
6
किरकोळीचा घाऊक व्यापार

भारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे.

भारतात किरकोळ व्यापार हा कदाचित हजारो वर्षांपासून चालत आलेला जुना व्यवसाय आहे. अगदी पुरातन काळी वैश्य समाज हा व्यवसाय चालवत असे. पुढे गावागावांतून आठवडय़ातील ठरावीक दिवशी किरकोळ व्यापाराचा सामूहिक कार्यक्रम करण्याची प्रथा सुरू झाली. ‘हाट’ या शब्दाने ओळखला जाणारा कार्यक्रम बाजारहाट म्हणून पुढे प्रचलित झाला व आजही वापरात असलेला वाक्प्रचार म्हणून आपणा सर्वास परिचित आहे. प्रथमत: मालाची अदलाबदल, मग चलन-पैशांच्या बदल्यात मालाची किरकोळ विक्री, मग आठवडय़ाच्या बाजारातून स्थायिक दुकानांची मांडणी असे टप्पे पार करीत आज या किरकोळ व्यापाराची शहराशहरांत प्रचंड शहरात जणू जत्राच लागलेली असते. वस्तुभांडाराच्या रूपाने सुरू झालेली ही किरकोळ व्यापाराची जत्रा आज बहुमजली वातानुकूलित इमारतीमध्ये कायमस्वरूपी भरणारी जत्राच झाली आहे. वॉल मार्टसारखी किरकोळ दुकानांची साखळी १९६२ साली स्थापन झाली. सॅम वॉल्टनने लावलेले हे रोप आज वाढत जाऊन अमेरिकन भांडवली बाजारात १,३९,५०० कोटी रुपये मूल्य असणारे वृक्ष स्वरूपात दिसते आहे. भारतातही किरकोळीचा हा घाऊक बाजार वेगाने प्रगती करताना दिसत आहे. आज ही किरकोळीची बाजारपेठ ३,२०,४०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. वार्षिक १३ ते १५ टक्क्यांनी वाढणारा हा व्यापार २०१८-१९ पर्यंत ५,६८,००० कोटी रुपयांच्या घरात जाईल असाही एक अंदाज आहे; पण पाश्चिमात्य देशांपेक्षा भारतातील किरकोळ व्यवसाय वेगळ्या वळणावर आहे. आज भारतात जवळजवळ ९२% किरकोळ व्यापार हा विस्कळीत स्वरूपाचा आहे. या विस्कळीत स्वरूपात अगदी फुटकळ किराणामालाच्या दुकानापासून शहरातील थोडी मोठी पण व्यक्तिगत मालकीची दुकाने मोडतात; पण संघटित किरकोळी घाऊक व्यापार आता पाश्चिमात्य देशांच्या चालीवर भारतातही वाढीस लागला आहे. २००९ साली केवळ ९,३०० कोटी रुपयांचा असणारा हा व्यवसाय २०१२ साली २५,००० कोटी रुपयांच्या घरात होता, तर २०१९ सालापर्यंत तो ५६,९०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

भारतात आज एका अंदाजाप्रमाणे किरकोळ व्यापाराची साधारण १.४ कोटी दुकाने आहेत; पण त्यातील ९६% दुकाने ही ५०० चौ. फुटांपेक्षा कमी आकाराची आहेतजगभरातील किरकोळ व्यापारात भारत २०१२ साली पाचव्या स्थानावर होता, पण आज मात्र तो १४व्या स्थानावर घसरला आहे. परदेशी गुंतवणुकीचे सरकारी अस्थिर धोरण हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. ब्राझील, चिली, चीन, दुबई, टर्की यांसारखे देश हे या किरकोळ व्यापारात अव्वल स्थानांवर आहेत; पण भारतीय अर्थव्यवस्थेत होणारी वाढ आणि भारतीय लोकसंख्येत तरुण पिढीची होणारी वाढ, त्यांची पैसा खर्च करण्याची क्षमता इत्यादी सर्व गोष्टींचा विचार केला, तर या किरकोळ घाऊक व्यापाराची जोमाने वृद्धी होण्यास खूपच वाव आहे. आज भारतात २५ वर्षांच्या आसपास असणारे ५० कोटी तरुण-तरुणी आहेत. त्यांना लागणारे कपडे, डबाबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेये, भ्रमणध्वनी, जलद सेवा देणारी उपाहारगृहे, सौंदर्य प्रसाधने इत्यादी चिन्हांकित उत्पादनांची विशेष मागणी कायम राहणार आहे. भारतातील १५ ते ५४ वयोगटातील काम करणाऱ्या ग्राहकांच्याही वेगळ्या गरजा आहेत. सतत वाढत असलेल्या त्यांच्या आमदनीमुळे आणि एकूणच बदललेल्या राहणीमानामुळे चैनीच्या वस्तू, चिन्हांकित कपडे, आरोग्य व सौंदर्य प्रसाधने इत्यादी गोष्टींची मागणी सतत वाढणार आहे. ग्रामीण बाजारपेठ आज किरकोळ घाऊक व्यापारात तर नवीन क्रांती घडवण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी शेतीविषयक सामग्रीचीच दुकाने असणाऱ्या ग्रामीण भागात चक्कर टाकली तर चकचकीत प्रदर्शन मांडून बसलेली कित्येक किरकोळ दुकाने आज भारतभर वाढतानाच दिसतात. किरकोळ व्यापारात भारतीय ग्रामीण किंवा आर्थिक निम्नस्तरावर आणखी एक क्रांती जगप्रसिद्ध झाली ती म्हणजे चहा, साबण, तेल इत्यादी वस्तूंची लहान वेष्टने. १०० रुपयांचा चहाचा पुडा घेणे या गरिबांना शक्य नसते, पण ५/५ रुपयांचा चहा, खोबरेल तेल, सौंदर्य प्रसाधने इत्यादी वस्तू दररोज घेणे त्यांना शक्य असते. या सर्व बदलणाऱ्या भारतीय बाजारपेठेच्या विभागामध्ये आणखी एका विभागाची लक्षणीय वाढ होत आहे व ती म्हणजे नव अतिश्रीमंतांची.

जागतिक संपत्ती अहवालानुसार २०१४ साली कोटय़धीश भारतीयांच्या संख्येत ५१ टक्क्यांनी वाढ झाली. आशिया खंडात दुसरा क्रमांक! या लोकांना लागणारी सोमरसापासूनची विशिष्ट चिन्हांकित पेये, घर सजावटीचे वैशिष्टय़पूर्ण विशेष सामान, आरामदायी गाडय़ा, चैनीच्या वस्तू, सौेंदर्य प्रसाधने इत्यादी गोष्टींची किरकोळ बाजारपेठ जोमाने वाढते आहे. पूर्वी हेच लोक परदेशातून या वस्तू घेऊन येत; पण आज याच चैनीच्या वस्तू, चिन्हांकित उत्पादक भारतात बनवत आहेत व परदेशी लोक त्यांच्या किमतीमुळे भारतात येऊन खरेदी करून जात आहेत असे दृश्य पाहायला मिळते. ‘भारतात बनवा’ याचा हाही एक फायदा!


Similar questions