History, asked by Anonymous, 11 months ago

krantijoti savitribai fule essye in Marathi ​

Answers

Answered by xShreex
0

\huge\underline\frak{\fbox{AnSwEr :-}}

एकोणविसाव्या शतकाच्या मध्यार्थात ज्या वेळी भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणा-या देशात स्त्रीला समाजात 'चूल आणि मूल ' एवढेच स्थान होते, स्त्रीला समाजात कोणताही दर्जा नव्हता अशा वेळी तिला शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले. पुण्यात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून जोतिबांनी इ. सवी. सन १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या शाळेत काम करण्यासाठी शिक्षिका मिळत नसल्याने जोतीरावांनी आपल्या अशिक्षित पत्नीला घरी लिहायला आणि वाचायला शिकवले. पुढे त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली.

सावित्रीबाईंना स्वत:चे अपत्य नव्हते पण दिनदलितांना व अनाथांना जवळ करून सावित्रीबाईंनी पोटाच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या कार्यात उत्तम साथ दिली. सर्व टीका,छळ सहन करून समाज सुधारण्याचे काम केले. जोतीबा फुले व सावित्री बाईंचे शिक्षणाचे पवित्र कार्य चालू असतांना, त्यांच्या ह्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न जोतीरावांच्या वडिलांनी केला. त्यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यामुळे धर्माला काळिमा लागेल, बेचाळीस पिढया नरकात जातील असे त्यांचे समज होते. पण सावित्रीबाई आपल्या कार्यापासून डगमगल्या नाही. त्यांच्या मुलींच्या शाळेत मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली. पुण्यात त्या काळात हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यामुळे समाजात सावित्रीबाईंचा दरारा निर्माण झाला होता. सावित्रीबाई जवळ विलक्षण चिकाटी व कठोरपणा होता.

संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दिन-दलितांसाठी शाळा काढली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत असतांना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ नातेवाईकांनी, समाजाने, सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असतांना त्यांना लोकांकडून शिवीगाळ, त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्या सारखीच वाटत. ही सर्व कृत्य त्यांना विध्यार्थ्यांना शिकविण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे. एकदा शाळेत जात असतांना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून ,"मुलींना आणि महार - मांगाना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही" अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली.

सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे पर्यवेकशक असतांना त्यांनी थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली हे भूषावह आहे असा शेरा दिला. त्या काळात विधवा महिलांचे केशवपन होत असे कारण विधवा स्त्री ने संन्यासिनी सारखे जीवन जगावे अशी रूढी होती. स्त्रीला अपशकुनी समजले जात असे. तिला पांढरे वस्त्र परिधान करावे लागत असे. त्यांना घरात कोंडून ठेवले जात असे हे स्त्रियांचे दुख त्यांनी जवळून पहिले होते. केशवपनाची दृष्टप्रथा नष्ट झाली पाहिजे असे त्यांना वाटे, पण लोक ऐकत नव्हते म्हणून जोतीबा आणि सावित्रीबाईंनी सर्व नाव्ह्यांची सभा बोलावली. आपण आपल्या भगिनींवर वस्तरा चालवितो हे मोठे पाप आहे याची जाणीव करून दिली. नाव्ह्यांनाही त्याची जाणिव झाली आणि त्यांनी पाठिंबा दिला.

सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधकगृह सुरु केले. बाल-विधवांचे दुखः त्यांनी जाणले होते, स्त्रीभ्रूण हत्याही सर्रास घडत असे म्हणून बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केले. अस्पृश्यांसाठी जोतिबांनी सार्वजनिक पाण्याचे हौद खुले केले. इ. स. १८९३ साली सत्यशोधक समाजाचे मोठे अधिवेशन सासवडला भरले होते त्याच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या. त्यात त्यांनी आपले विचार परखडपणे मांडले. १० मार्च १८९७ रोजी पुण्यात प्लेगची साथ आली होती. दुर्दैवाने त्यांना प्लेगने घेरले आणि त्यातच या क्रांतिकारक महिलेने जगाचा निरोप घेतला.

Similar questions