Hindi, asked by singhutsav8237, 10 months ago

लोभी कुत्रा कथा लेखन मराठी

Answers

Answered by mad210216
47

"लोभी कुत्रा"

Explanation:

एका गावात एक कुत्रा राहत होता. एक दिवशी त्याला खूप भूक लागली होती. त्याला काहीतरी खायला मिळावे म्हणून तो आजूबाजूच्या परिसरात फिरत होता.

तेव्हा त्याला एका घराबाहेर भाकरीचा तुकडा सापडला. त्याने तो तुकडा त्याच्या तोंडाने उचलला व तो परत त्याच्या घराच्या दिशेने जाऊ लागला.

रसत्यात एक नदी होती. तो नदीवर असलेल्या पूलावरून चालत जात होता. तेव्हा त्याची नजर नदीच्या पाण्यातील त्याच्या सावलीकडे गेली.

त्याला असे वाटले की पाण्यात आणखी एक कुत्रा आहे ज्याच्या तोंडात त्याच्यासारखे भाकरीचा तुकडा आहे. त्याला ती भाकर हवी होती. म्हणून तो पाण्यातील कुत्र्यावर भुंकू लागला, तेव्हा तोंड उघडताच त्याच्या तोंडातली भाकर नदीत पडली. कुत्र्याला काहीच खायला  मिळाले नाही व तो उपाशी राहिला.

तात्पर्य: आपल्या आयुष्यात आपल्याकडे जे काही आहे त्यात आपण समाधानी रहायला पाहिजे.

Answered by ssp18475gmailcom
0

Answer:

bts

Explanation:

BTS v

ksnhdndjdjndismsksis

Similar questions