*'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी..' ही काव्यपंक्ती कोणाची आहे ?*
1️⃣ विंदा करंदीकर
2️⃣ सुरेश भट
3️⃣ कुसुमाग्रज
4️⃣ मंगेश पाडगावकर
Answers
Answer:
option 2 is right answer
सुरेश भट
Explanation:
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ही कवी सुरेश भट यांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे. कवितेच्या माध्यमातून कवी सुरेश भट आपले मराठी भाषेविषयी असणारे प्रेम व्यक्त करताना दिसतात.मराठी भाषा ही त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे किंवा मराठी भाषेची थोरवी ही किती महान आहे हे आपल्या कवितेच्या माध्यमातून ते सादर करतात.
कवी सुरेश भट मराठीची थोरवी गात असताना सांगतात की कुठलेही जातीचे धर्माचे पंथाचे लोक असून मराठी भाषेमुळे हे सर्व लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. कारण मराठी भाषा ही प्रत्येकाच्या मनामनात नसानसात पुरा उरात भिणलेली आहे असे कवी म्हणतात.
मराठी भाषा फक्त मोठ्यांना किंवा तरुणांना जवळ करत नाही तर अगदी लहानात लहान व्यक्तीला देखील ती आपल्यास करते आणि दिशा दिशांमध्ये आपला झेंडा फिरवते. अगदी दऱ्याखोऱ्यांमधून असो किंवा फुलाफुलातून असो मराठी भाषा ही प्रत्येकापर्यंत पोहोचत असते असे कवी म्हणतात.
मराठी भाषा ही कुणासाठी ही परकी नसते. दुसऱ्या राज्यातील व्यक्ती असो किंवा दुसऱ्या देशातील व्यक्ती असो ती प्रत्येकाला आपली शी करते जरी मराठी भाषेचे स्थान हे तेवढे प्रगल्भ झाले नसेल तरी मराठी भाषा मात्र सर्वांना आपलेसे करण्यात समर्थ आहे असे कवीला वाटते .
कवी सुरेश भट यांच्या अधिक कवितांच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा -
https://brainly.in/question/44153911
https://brainly.in/question/51119748
#SPJ3