Geography, asked by vishalgmore2108, 1 month ago

लिंग गुणोतर म्हणजे काय?​

Answers

Answered by hs214304
2

Answer:

ok hers my answer a long one

Explanation:

दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेले स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंगगुणोत्तर. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप वजा केला, तर नैसर्गिक रित्या दर १०० मुलींमागे साधारणतः १०४ ते १०७ मुलगे जन्माला येतात. जैविक रित्या लहान मुलगी ही मुलापेक्षा अधिक चिवट असल्याने मुलींच्या प्रमाणातील सुरुवातीची कमतरता जलद गतीने भरून निघणे अपेक्षित असते. मानवी समाजामध्ये लिंग गुणोत्तर हे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मोजले जाते. उदा., जन्माच्या वेळचे गुणोत्तर, तसेच ० – ६, ० – १९, १५ – ४५, ६० + इत्यादी. वेगवेगळ्या वयोगटातील लिंग गुणोत्तराच्या आकडेवारीवरून त्या विशिष्ट वेळेच्या सामाजिक वास्तवांसंधर्भात अंदाज बांधता येतो. लिंग गुणोत्तर हे विकासाचा निर्देशांक म्हणून स्त्रियांच्या समाजातील स्थानाविषयी प्रकाश टाकते.

गर्भ लिंग ओळखण्याचे विज्ञान व तंत्रज्ञान विकासित होण्यापूर्वी नको असलेल्या मुलींची जन्मताच विविध पद्धतींचा वापर करून हत्या केली असे. स्त्री अर्भक हत्त्या किंवा मुलींना दुर्लक्षित करून हे मृत्यू नैसर्गिक कसे आहेत, हे दाखविण्याचे प्रयत्न अनेक कुटुंबांकडून केले जात होते. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री अर्भक हत्येची प्रथा काही समूहांपुरती आणि प्रदेशांपुरती मर्यादित असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. इ. स. १७८९ मध्ये ब्रिटिशांना या प्रथेचा पहिल्यांदा शोध लागला आणि इ. स. १८२४ व इ. स. १८२८ मध्ये ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्त्री अर्भक हत्या’ विषयक दोन प्रमुख अहवाल त्यांनी सादर केले. इ. स. १८७० मध्ये ब्रिटीश सरकारने स्त्री बालहत्या कायदा अंमलात आणला. या कायद्यांतर्गत गुन्ह्यात सामील असलेल्या व्यक्तींना दोषी ठरवून शिक्षेची तरतूद करण्यात आली; परंतु शिक्षेची अमलबजावणी कठीण होत असल्याने इ. स. १९०६ मध्ये हा कायदा ब्रिटिशांनी रद्द केला. परिणामी इ. स. १९४१ मध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण ९४५ : १००० इतके होते.

भारतातील लिंग गुणोत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ व जगातील काही देशांमध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण हे ‘दर १०० स्त्रियांमागे असलेली पुरुषांची संख्या’ या प्रमाणे अस्तित्वच नष्ट होईल’ अशी शक्यता वर्तवली. त्यांच्या या मताविरुद्ध १९८३ मध्ये अर्थशास्त्रज्ञ धर्म कुमार यांनी लिंग गुणोत्तरविषयक अर्थशास्त्रीय सिद्धांताचा नियम लावून विवादास्पद मांडणी केली. त्यांच्या मते, ‘मागणी आणि वितरणाच्या नियमानुसार जर देशातील मुलींची संख्या कमी झाली, तर समाजात त्यांची मागणी वाढून त्यांचे मूल्य वाढेल. यामुळे हुंड्याच्या मागणीत घट होऊन स्त्रियांची स्थिती सुधारण्यास मदत होईल’. याला प्रतिउत्तर देत त्याच वर्षी मानवशास्त्रज्ञ लीला दुबे यांनी म्हटले की, ‘घटणाऱ्या महिलांच्या संख्येमुळे .

(२) गर्भलिंग निदान व गर्भपात : जन्म वेळच्या लिंग गुणोत्तर ठरविण्यामध्ये गर्भलिंग निदान आधारित होणाऱ्या गर्भपाताचा सुद्धा अंतर्भाव असतो. भारत सरकारच्या सांख्यिकीय आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे (मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन) २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जन्म वेळच्या लिंग गुणोत्तरामध्ये मुलींची संख्या सातत्याने प्रतीवर्षी कमी होताना दिसून येते आहे. या आकडेवारीनुसार दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे २०११ – ९०९, २०१२ – ९०८, २०१३ – ८९८, २०१४ – ८८७ व २०१५ – ८८१ असे कमी होताना

Similar questions