लैंगिक संसर्गजन्य रोग
Answers
Answer:
Explanation:
अंडकोश वृषणसूज
कधीकधी बीजांडास जंतुदोष होऊ शकतो. अशा वेळी खूप वेदना, ताप व बीजांडास सूज अशी लक्षणे असतात
एच.आय.व्ही आणि एडस्
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो.
एड्स
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते.
एड्स : प्रतिबंधक काळजी
संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.
एड्स : समुपदेशन व उपचार
एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.
एड्स आणि टी.बी.
एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात.
एसटीडीसहित गर्भधारणा
एसटीडीसहित म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेससहित गर्भधारणा या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
कटीभागाचा दाहरोग (पीआयडी)
कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) हा एक सर्वसाधारण शब्दप्रयोग आहे जो गर्भाशय, फॅलोपिन ट्यूब (डिंबग्रंथींमधून गर्भाशयात अंडी वाहून नेणारी नळी) आणि इतर पुनरुत्पादक अवयवांच्या संक्रमणाशी निगडीत आहे.
कोंब : (वार्ट)
हा एक विषाणू (पॅपिलोमा व्हायरस) आजार आहे. या आजारात जननसंस्थेच्या त्वचेवर कोंब येतात.
क्लॅमिडीया
क्लॅमिडीया हा समागमाव्दारे संसर्गजन्य रोग आहे.क्लॅमिडीया हा समागमाव्दारे पसरणारा व नेहमी आढळणारा रोग असून तो क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस या विषाणूमुळे होतो.
गरमी (सिफिलिस)
जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सुमारे 10-90 दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात.