Biology, asked by piyushtiwari831986, 6 months ago

लैंगिक संसर्गजन्य‌‌‌ रोग है

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

लैंगिक समस्या व रोग

अंडकोश वृषणसूज

कधीकधी बीजांडास जंतुदोष होऊ शकतो. अशा वेळी खूप वेदना, ताप व बीजांडास सूज अशी लक्षणे असतात

एच.आय.व्ही आणि एडस्

हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो.

एड्स

हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते.

एड्स : प्रतिबंधक काळजी

संयमी जीवन, लैंगिक एकनिष्ठता, आणि असुरक्षित लैंगिक संबंधात निरोध वापर अशी या आजाराविरुध्द त्रिसूत्री आहे.

एड्स : समुपदेशन व उपचार

एच.आय.व्ही किंवा एड्स तपासणी व पुढील उपचार करण्यासाठी माहीतगार समुपदेशकांची गरज असते.

एड्स आणि टी.बी.

एड्सच्या रुग्णांना टी.बी. होतो असे दिसून आले आहे. एड्स आजारात पांढ-या पेशींची संख्या कमी झाल्यावर टी.बी.चे हे जंतू 'तुरुंग फोडून' मोकळे होतात.

एसटीडीसहित गर्भधारणा

एसटीडीसहित म्हणजेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेससहित गर्भधारणा या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

कटीभागाचा दाहरोग (पीआयडी)

कटीभागाचा दाहरोग (पीआयडी) हा एक सर्वसाधारण शब्दप्रयोग आहे जो गर्भाशय, फॅलोपिन ट्यूब (डिंबग्रंथींमधून गर्भाशयात अंडी वाहून नेणारी नळी) आणि इतर पुनरुत्पादक अवयवांच्या संक्रमणाशी निगडीत आहे.

कोंब : (वार्ट)

हा एक विषाणू (पॅपिलोमा व्हायरस) आजार आहे. या आजारात जननसंस्थेच्या त्वचेवर कोंब येतात.

क्लॅमिडीया

क्लॅमिडीया हा समागमाव्दारे संसर्गजन्य रोग आहे.क्लॅमिडीया हा समागमाव्दारे पसरणारा व नेहमी आढळणारा रोग असून तो क्लॅमिडीया ट्रॅकोमॅटीस या विषाणूमुळे होतो.

गरमी (सिफिलिस)

जंतुदूषित व्यक्तींशी केलेल्या लैंगिक संबंधानंतर सुमारे 10-90 दिवसांत कधीही याची लक्षणे दिसतात.

झोपेत धातू जाणे

बरेच पुरुष, विशेषतः वयात येणारी मुले स्वप्नदोषाची तक्रार करतात. झोपेत लैंगिक इच्छा होऊन वीर्य बाहेर पडणे याला स्वप्नदोष असे नाव आहे

दुखरा व्रण (शांक्रॉईड)

या रोगात जननेंद्रियावर दुखणारा व्रण तयार होतो म्हणून त्याला 'दुखरा व्रण' असे आपण म्हणू या.

नागीण

गुप्तांगाची नागीण हा समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) असून तो प्रकार 1 आणि प्रकार 2 च्या हार्पिस सिम्प्लेक्स व्हायरसेस (एचएसव्ही-1) आणि एचएसव्ही-2 मुळे होतो.

परमा

परमा हा एक समागमाव्दारे पसरणारा रोग (एसटीडी) आहे. हा रोग निस्सेरीया गोनो-हीई या विषाणूमुळे होतो.

परमा (गोनोरिया)

परमा किंवा गोनोरिया हा जिवाणूंमुळे होणारा आजार असून संसर्गानंतर एक-दोन दिवसांतच याचा परिणाम दिसतो.

पुरुष जननसंस्थेची तपासणी

मधुमेह असेल तर ब-याच वेळा शिश्नाचा पुढचा भाग सुजलेला व अस्वच्छ दिसतो.

पुरुषजननसंस्था

अंडकोशातील बीजांडे, त्यातून निघणा-या वीर्यनलिका, वीर्यनलिकांच्या शेवटी असणारे वीर्यकोश, प्रॉस्टेस्ट ग्रंथी आणि शिश्न या सर्वांची मिळून पुरुष जननसंस्था बनलेली आहे.

प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ

उतारवयात प्रॉस्टेट ग्रंथीची वाढ होते. सर्वांनाच त्याचा त्रास होतो असे नाही.

बीजांड अंडकोशात न उतरणे

बीजांडे गर्भावस्थेत पोटात असतात व जन्माच्या आधी काही आठवडे अंडकोशात उतरतात.

बीजांडास पीळ पडणे

बीजांडाच्या रक्तवाहिन्या व चेतातंतू यांचा एक गठ्ठा (बंडल) असतो.

मातृत्व आणि एचआयव्ही

आई होणे हा आपल्या आयुष्याचा एक विशेष क्षण आहे आणि आईने आपल्या बाळासाठी सुरक्षित आणि पूर्णपणे तयार असावे.

मूत्रनलिकादाह

परमा हे याचे महत्त्वाचे कारण आहे. परमा या रोगाशिवाय इतर काही जंतुंमूळे लैंगिक संबंधातून मूत्रनलिकादाह होतो.

मृदु रतिव्रण

हीमोफायलस दुक्रेयी नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे बहुधा संभोगजन्य असलेल्या आणि गुप्तेंद्रियावर व्रण उत्पन्न करणाऱ्या विकृतीला ‘मृदू रतिव्रण’ म्हणतात. संभोगजन्य असल्यामुळे या विकृतीचा ⇨ गुप्तरोगात समावेश होतो.

मैथुनक्रियेतील मानसिक समस्या

गैरसमजामुळे किंवा अवास्तव कल्पनांमुळे ब-याच पुरुषांना आपण 'कमजोर आहोत'अशी भावना होते.

लघवीचे छिद्र बारीक असणे

हा बहुधा जन्मजात दोष असतो. यात मूत्रनलिकेत काही दोष नसतो पण बाहेरचे लघवीचे छिद्र खूप बारीक असते.

लिंगसांसर्गिक आजार

लिंगसांसर्गिक आजार म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे सांसर्गिक आजार. याला पूर्वी गुप्तरोग असे नाव होते.

लैंगिक शरीरक्रिया विज्ञान

शारीरिक संबंधाच्या वेळी एक प्रकारची सुरक्षितता व एकांत आवश्यक असतो, तसेच स्त्रीपुरुषांमध्ये एक विश्वासाचे व प्रेमाचे नाते आवश्यक असते.

लैंगिक समस्या

लैंगिक इच्छा व ऊर्जा हीच समस्त प्राणीवर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी व मानव यांच्या लैंगिकतेत काही महत्त्वाचे फरक आहेत.

वीर्यकोश - प्रॉस्टेट ग्रंथीचा जंतुदोष

लिंगसांसर्गिक आजारातील 'गोनोरिया' (परमा) व इतर काही 'पू' निर्माण करणा-या जंतूंपासून वीर्यकोश व प्रॉस्टेट ग्रंथींचा जंतुदोष होतो.

Similar questions