Sociology, asked by karanwaghmare417, 1 month ago

लिंगभाव आधारित विविधता टिपा लिहा





Answers

Answered by pnandinihanwada
2

Answer:

स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनांमध्ये फरक आहे, पण समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात, त्या सर्वांचे कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरकांमध्ये सापडेलच असे नाही. लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो. स्त्रिया आणि पुरुषांना विशिष्ट प्रकारे वाढवले जाते; यात स्त्रियांनी व पुरुषांनी कसे वागावे हे शिकवले जाते. ह्याच स्त्रीत्व आणि पुरुषत्व ह्या कल्पना होत. ह्या कल्पना माणसांच्या वागणुकीवर खोलवर प्रभाव टाकतात. स्त्रीत्व आणि पुरुषत्वाच्या रूढ कल्पना ह्या स्त्रिया आणि पुरुषांना साचेबद्ध करून एकमेकांविरुद्ध उभे करतात. उदा. स्त्रीने सहनशील, नम्र असावे, आज्ञाधारक असावे, सर्वांशी जुळवून घ्यावे अशी अपेक्षा असते. तर पुरुषांना आक्रमक बनायला मुभा असते. ह्या कल्पना स्त्री-पुरूषांवर अवास्तव ओझे लादतात. उदा. पुरुषांना रडायची मोकळीक नसते. एखादा पुरुष रडायला लागला तर, काय मुलीसारखा मुळूमुळू रडतोस म्हणून हिणवले जाते. एखादी स्त्री जोरजोरात बोलली, हसली तर तिच्याकडे पुरुषी म्हणून बघितले जाते. घरकाम, चूल-मूल ही बाईची जबाबदारी तर घराबाहेरच्या जबाबदाऱ्या पुरुषाच्या मानल्या जातात. मुलींना लहानपणी खेळायला बाहुली, भातुकली तर मुलांना सायकल, कार, बंदूक अशी खेळणी दिली जातात. प्रौढ वयात येणाऱ्या जबाबदारीचे प्रशिक्षण लहान वयातच सुरु होते. स्त्री-पुरुषामधला शारीरिक फरक हा प्रामुख्याने त्यांच्या पुनरुत्पादनासंदर्भातील भिन्न जबाबदाऱ्या हा आहे. पुरुषाकडे रेतन तर स्त्रीकडे गर्भारपण, बाळंतपण आणि स्तनपान अशा प्राकृतिक जबाबदाऱ्या आहेत मात्र या पलीकडे कोणतीही कामे स्त्री/पुरुष कोणीही करू शकतात. उदा. स्वयंपाक, घरसफाई, शिवण-टिपण, शेतातले काम, डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, शिक्षक इ.इ. मात्र घरकाम आणि बालसंगोपन ह्या आजही स्त्रीच्याच प्राथमिक जबाबदाऱ्या मानल्या जातात. इतक्या की बाहेरच्या जगातही स्त्रियांना बहुतेकदा घरकामाची विस्तारीत कामे मिळतात उदा. शिक्षिका, नर्स, स्वागतिका अशा प्रकारच्या कामात स्त्रियांचा अधिक भरणा असतो. अगदी शेतीकामातही स्त्रियांना पुरुषाच्या तुलनेत कमी मजुरी देण्याची मानसिकता आढळते. अर्थात काळानुसार आणि समाज परिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे लिंगभावाच्या कल्पना आता बदलत चालल्याचे/खुल्या होऊ लागल्याचेही दिसते. या लिंग भावाचा उल्लेख जेंडर असाही केला जातो.

Answered by xxJAYESHxx
0

Explanation:

bro what's ubr question write in English I don't understand

Similar questions