लिहा.
आजच्या शिक्षणाबाबत स्वमत
Answers
Answer:
सध्याची परिस्थिती
सध्याची परिस्थिती बघता बहुसंख्य शाळा अथवा प्रशिक्षक फक्त ‘अध्यापन’ ऑनलाईन करण्यावर भर देत आहेत, असे दिसत आहे. झूम किंवा गूगल मीट सारखे तंत्रज्ञान वापरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा व्हिडियो कॉल सेटअप करणे आणि त्यात शिक्षकांनी वर्गात बोलतात, त्याप्रमाणे बोलून शिकवणे अशी सध्याच्या बहुसंख्य ऑनलाईन वर्गांची परिस्थिती दिसत आहे. काही कल्पक शिक्षक आपल्या लेक्चरचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन करून, ते व्हिडियो कॉलवर दाखवतात आणि विषय समजावून सांगतात. काही शिक्षक फळा समोर ठेवून, त्यावर वर्गात शिकवत असल्यासारखे खडूने मुद्दे लिहून शिकवतात. तर काहीजण नुसतंच व्हिडियो कॉलवर बोलल्यासारखे बोलतात. अर्थात, यात शिक्षकांचा काही दोष आहे, असे मला वाटत नाही. शिक्षकांचे सर्व प्रशिक्षण हे वर्गात शिकवण्याच्या दृष्टीने झालेले असताना आणि वर्गात शिकवण्याचाच अनुभव त्यांच्यापाशी असताना अचानक ऑनलाईन अध्यापन करावे लागणे, हा त्यांच्यासाठी प्रचंड मोठा बदल आहे. यासाठी त्यांचे प्रशिक्षण झालेले नाही (किंवा अगदी कमी वेळात तशी तयारी त्यांना करावी लागली आहे).
दुसऱ्या घटकाचा, अध्ययनाचा, विचार केला, तर त्यासाठी आज प्रामुख्याने पारंपारिक साधने आणि पद्धतीच वापरल्या जात आहेत. अध्ययनाचे पारंपारिक साधन म्हणजे पाठ्यपुस्तक आणि पद्धत म्हणजे पुस्तकातले धडे वाचून त्याखालची प्रश्नोत्तरे सोडवणे. खरेतर कोणताही विषय शिकण्यासाठी आजच्या ऑनलाईन जगात प्रचंड मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस उपलब्ध आहेत. युट्यूबवरचे व्हिडियोज, विकिपीडियासारखे माहितीचे संग्रह इथपासून ते अनंत ब्लॉग्ज आणि माहितीचे संकलन करणाऱ्या वेबासाईट्स उपलबद्ध आहेत. असे असताना अध्ययनासाठी फक्त पाठ्यपुस्तकावर अवलंबून रहाणे, हे शिक्षण मर्यादित चाकोरीमध्ये अडकवून ठेवण्यासारखे आहे. काही शाळांमधले काही शिक्षक, अशी साधने (रिसोर्सेस) वापरायला मुलांना प्रोत्साहन देत आहेत, मात्र बहुसंख्य ठिकाणी ऑनलाईन माध्यमाचा प्रभावी वापर करून, अध्ययन पाठ्यपुस्तकापलिकडे नेण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मूल्यमापनाची पारंपारिक पद्धत म्हणजे वेळोवेळी घेतल्या गेलेल्या चाचण्या आणि परीक्षा. छोट्या चाचण्यांसाठी ऑनलाईन माध्यमांमध्ये स्पर्धा (Quiz), सर्वेक्षण (Survey) किंवा मतचाचणी (Polls) सारखी तंत्र वापरता येऊ शकतात किंवा गूगल फॉर्मस वापरून मुलांकडून प्रश्नोत्तरे मागवता येऊ शकतात. सध्या मात्र मूल्यमापनासाठी कागद-पेन या पारंपारिक साधनांचाच वापर होताना दिसत आहे. शिक्षकांनी प्रश्नोत्तरे स्कॅन करून पाठवणे, त्याचा प्रिंटआउट काढून त्यावर ती सोडवणे आणि ते स्कॅन करून शिक्षकांना परत पाठवणे किंवा वहीत प्रश्नोत्तरे लिहून, त्याचा फोटो शिक्षकांना पाठवणे हे बहुसंख्य ठिकाणी केले जाताना दिसत आहे.
एकूणात, अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन या शिक्षणाच्या तीन अंगांपैकी प्रामुख्याने अध्यापन ऑनलाईन केले जाताना दिसत आहे. परंतु तिथेही ऑनलाईन माध्यमाची पूर्ण क्षमता वापरली जात आहे, असे दिसत नाही.