२. लिहिते व्हा.
(१) स्मारकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश
होतो?
(२) तवारिख म्हणजे काय
(३) इतिहासलेखनात लेखकांचे कोणते पैलू महत्त्वाचे
असतात?
३. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा.
(१) भौतिक साधने, लिखित साधने, अलिखित
साधने, मौखिक साधने
(२) स्मारके, नाणी, लेणी, कथा
(३) भूर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ, चित्रे
(४) ओव्या, तवारिखा, कहाण्या, मिथके
४. संकल्पना स्पष्ट करा.
(१) भौतिक साधने
(२) लिखित साधने
(३) मौखिक साधने
Answers
Answer:
प्रश्न क्र.2 -: उत्तर
(1) स्माकांमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? उत्तर : स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ (स्मृतिशिळा) थडगे, विजयस्तंभ, विजयकमानी इत्यादींची समावेश होतो.
(2) तवारिख तथा तवारीख या अरबी शब्दाचा अर्थ इतिहास आहे. यात कालक्रमानुसार घटनांची जंत्री व वर्णने लिहिली जातात. इस्लामपूर्व-काळातील अरबी जमातींचा लिखित व अलिखित इतिहास दंतकथांनी भरलेला असे. हदीस म्हणजे इस्लामी स्मृतीशास्त्रांच्या नियमांनुसार इतिहासलेखनात 'इस्नाद' म्हणजे अनेक पुरावे दिले जात.
3. गटातील वेगळा शब्द शोधून लिहा.
उत्तर-: (1) अलिखित साधने
(2) लेणी
(3) मंदिरे
(4) तारीख
प्रश्न क्र. 4 -: उत्तर
(1) भौतिक साधने वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ' भौतिक साधने ' असे म्हणतात .
(2) लिखित साधने लिपीचा विकास झाल्यानंतर लिहिली गेलेली व ऐतिहासिक माहिती देणारी साधने म्हणजे ' लिखीत साधने ' होय.
(3) मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेले लोकसाहित्य म्हणजे इतिहासाची ' मौखिक साधने ' होय.