लोकांच्या स्थलांतराला जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा.
Answers
Answer:
स्थलांतर ही प्रक्रिया सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक, आर्थिक, भौगोलिक अशा विविध घटकांच्या आंतरक्रियांचा परिपाक असते. ... (५) परस्पर समाजांतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व भाषिक ओढ तसेच भावनिक बांधिलकी यांचा स्थलांतरावर अनुकूल परिणाम होतो. स्थलांतराची दिशा ठरविण्यातसुद्धा हे घटक महत्त्वपूर्ण ठरतात.
Answer:
सामान्यतः लोकांचे स्थलांतर एका छोट्या गावातून मोठ्या गावाकडे होते किंवा एका गावातून शहराकडे होते. लोकांच्या स्थलांतराला खालील गोष्टी कारणीभूत असतात.
१. रोजगार: गावात राहणाऱ्या लोकांना शेती सोडून इतर रोजगाराचे पर्याय खूप कमी उपलब्ध असतात म्हणून रोजगारासाठी लोकांचे स्थलांतर होत असते.
२. शिक्षण : आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतातील अधिकतर गावांमध्ये फक्त दहावी किंवा जास्तीत जास्त बारावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध असते. त्यानंतरचे शिक्षण घेण्यासाठी गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरात स्थलांतर करावे लागते.
३. नवीन प्रकल्प : एखाद्या गावात एखादा नवीन प्रकल्प सुरू झाला की त्या गावातील लोकांना दुसरी ठिकाणे हलवावे लागते. उदाहरणार्थ एखादा धरणाचा प्रकल्प, अणू उर्जा प्रकल्प असे मोठमोठे प्रकल्प आल्यावर त्या गावातील लोकांना स्थलांतर तर करावे लागते.
४. नैसर्गिक संकट: भूकंप किंवा पावसाळ्यात एखादा डोंगर खचून आल्यामुळे पूर्ण गाव संकटात सापडते. अशा वेळी देखील गावातल्या लोकांना स्थलांतर करावे लागते.