लोक प्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये
Answers
भारतीय लोकशाहीमध्ये मतदार तीन स्तरांवर आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो. केंद्राच्या लोकसभेसाठी खासदार, राज्याच्या विधानसभेसाठी आमदार आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत सदस्य. या सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्राबद्दल जनेतेचे प्रश्न मांडणे आणि योग्य ते कायदे बनवणे अपेक्षित असते. कायदा बनवण्यासाठी मतदान करणं हे झालं एक काम. पण या व्यतिरिक्त कोणतेच काम 'केलेच पाहिजे' यामध्ये स्पष्टता नाही.
आपले लोकप्रतिनिधींना जबाबदार आणि उत्तरदायी हवे असतील तर त्यांच्या कामांमध्ये स्पष्टता असायला हवी.
निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून जनतेकडून प्रतिनिधींची निवड करण्यात येते. या प्रक्रियेत शांततेच्या मार्गाने परिवर्तन केले जाते.
निवडणूक प्रक्रियेमुळे लोकशाही पद्धती कायम टिकून राहण्यास मदत होते. राजकीय पक्षांना राज्यकारभार करण्यासाठी संधी मिळते. सामाजिक जीवनात काही बदल घडून येतात.
लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये पुढील प्रमाणे -
- लोकप्रतिनिधी प्रामाणिक व चारित्र्यवान असावा.
- लोकप्रतिनिधी जनतेची कदर करणारा असावा.
- लोकप्रतिनिधी विश्वासू व नम्र असावा.
- लोकप्रतिनिधी कामात कार्यक्षम असावा.
अशाप्रकारे लोकांच्या कल्याणासाठी निवडून दिलेले हे प्रतिनिधी यांनी नेहमी लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले पाहिजे.
#SPJ3