लॉकडाउन मध्ए माझा अनुभव वर निबंध in Marathi
Answers
Answered by
2
Answer:
लॉकडाऊन मधील काळात कोविड 19 वायरस पासून संरक्षण म्हणून आपल्या देशात सर्व काही बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान अनेक लोकांनी आपला वेळ वाया घालवला तर काहींनी आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत अनेक नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्न केलेत.
मित्रांनो आजच्या या लेखात मी तुमच्यासाठी लॉकडाऊन मधील अनुभव या विषयवार मराठी निबंध घेऊन आलो आहे. ह्या निबंधाला तुम्ही लॉकडाऊन आणि मी निबंध देखील नाव देऊ शकतात, तर चला निबंध सुरू करू आणि पाहू लॉकडाऊन मधील तुमचे.
लॉकडाऊन त्या स्थितीला म्हटले जाते ज्या स्थितीत शासनाद्वारे देशातील सर्व भागांना बंद करण्यात येते. याला उच्चस्तरीय बंदी देखील म्हटले जाते. ह्या बंदीला विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत लावले जाते. संपूर्ण विश्वात निर्माण झालेल्या कोरोना व्हायरस महामारी मुळे भारतासह जगभरात लॉकडाऊन लावण्यात आले होते. महामारी नियंत्रणात करण्यासाठी लॉकडाऊनची पद्धत यशस्वी तर आहे परंतु दिवसभर घरात बसून राहणे लोकांसाठी फारच कठीण आहे.
आपल्या देशात 24 मार्च 2020 ला पहिल्यांदा लॉकडाऊन लावण्यात आले. सुरुवातीला याचा कालावधी फक्त 21 दिवसांचा होता. परंतु नंतर लॉकडाऊन वाढवण्यात आले व 2020 चे संपूर्ण वर्ष घरातच गेले. देशातील लॉकडाऊन शाळा, कॉलेज, ऑफिस, सिनेमा हॉल, कार्यालय सर्व काही बंद करण्यात आले. फक्त सरकारी रुग्णालय, पोलिस स्टेशन आणि मेडिकल स्टोअर्स सुरू होते. या लॉकडाऊन मधील माझे अनुभव पुढील प्रमाणे आहेत.
लॉकडाऊन सुरू झाल्यावर ह्या दरम्यान काय करावे याचा विचार मी करू लागलो. सुरुवातीचे काही दिवस तर टीव्ही पाहणे, गेम्स खेळणे अश्या पद्धतीने मौज करण्यात गेले. नंतर मला लक्षात आले की मला मिळालेल्या या रिकाम्या वेळेचा मी सदुपयोग करून घ्यायला हवा. व मग मी माझ्या संपूर्ण दिनचर्याचे वेळापत्रक बनवले.
माझ्या दिवसाच्या सकाळची सुरुवात योग ने व्हायची. दररोज सकाळी उठल्यावर मी टीव्ही वर योग पहायचो. व त्या पद्धतीने व्यायाम करायचो. मला माहित होते की लॉकडाऊन मध्ये दिवसभर घरात बसल्याने माझे वजन वाढू शकते. म्हणून मी महिन्याभरात 5 किलो वजन कमी करण्याचा संकल्प घेतला. कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी इम्मुनिटी वाढवणे आवश्यक होते. म्हणून दररोज व्यायाम करणे देखील महत्त्वाचे झाले होते.
सकाळी व्यायाम केल्यावर अंघोळ वैगरे करून मी वर्तमान पत्र वाचायचो. वर्तमानपत्रांमुळे देशभरात असलेली परिस्थिती लक्षात यायची. माझी आई रोज पौष्टिक भोजन बनवायची. दुपारपर्यंत आमचे जेवण तयार व्हायचे. मी आईकडून वेगवेगळ्या रेसिपी शिकलो.
Explanation:
if it helps you then make me as brain list
Similar questions
Biology,
7 hours ago
Math,
7 hours ago
Hindi,
7 hours ago
CBSE BOARD XII,
13 hours ago
English,
8 months ago