Hindi, asked by muskanshaikh7107, 4 months ago

लॉकडाऊन चे फायदे तोटे speech​

Answers

Answered by rafathonor6
0

Answer:

message ke sath online paper bataya aur hamen thoda jankari Mili ham log ghar mein the

Answered by rudraksh1008
1

Answer:

देशात ‘कोव्हिड-१९’ने बाधित झालेला पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी नोंदविण्यात आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा एक लाखापार गेला. याचा अर्थ, रोज सरासरी ९०० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात तात्पुरते यश मिळाले; परंतु मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखण्यात लॉकडाऊन अपयशी ठरले आहे.

पंतप्रधानांनी दि. १२ मे रोजी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात नव्या स्वरूपातील लॉकडाऊन ४ ची घोषणा केली. मात्र, त्यासंबंधातील तपशील सांगितला नाही. लॉकडाऊन ३ संपेल, त्या आधी म्हणजे १८ मेपूर्वी या संबंधीची माहिती देण्यात येईल, असे ते म्हणाले होते. धोरणकर्त्यांनी याचा तपशील ठरविला, तेव्हा त्यांनी कदाचित काही घटकांचा प्राधान्याने विचार केला असावा. तो असा…

१. कोरोनाच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. अशा वेळी अर्थव्यवस्थेतील निष्क्रियता आपल्याला किती काळ परवडू शकेल?

२. ही साथ रोखण्यात काही प्रमाणात नियंत्रण आले आहे; परंतु रुग्णसंख्येत वाढ होत आहे आणि आपण पुन्हा सर्व सुरू केले, तर त्यामुळे रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.

३. आतापर्यंत बहुसंख्य नागरिकांनी सहकार्य केले आहे; परंतु आता ते निराश झाले आहेत, बेचैन झाले आहेत. लॉकडाऊन यापुढेही कायम ठेवला, तर आपण त्यांना अडवू शकतो का?

या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर उत्तर शोधणे अवघड आहे. मात्र, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भरतेवर आधारित अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनावर भर दिला होता. त्यातून बंद पडलेली अर्थव्यवस्था नव्या दमाने पुन्हा सुरू करण्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.

लॉकडाऊनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लाभ अधोरेखित होतात; परंतु हानीकडे दुर्लक्ष होते. त्याहीपेक्षा दुर्दैवी म्हणजे, लाभांविषयी अनिश्चितता आहे, एवढेच काय खरेच लाभ झाले आहेत का, अशी शंका येते. कोरोनाच्या साथीठी केलेले लॉकडाऊन म्हणजे पुराचे पाणी रोखून धरण्यासाठी बांधलेले तात्पुरते धरण आहे. एकदा का धरण फोडले, की सुरक्षित ठेवलेल्या कोरड्या भागाकडे पाणी धाव घेणार. कोरोना विषाणू अत्यंत धोकादायक आहे आणि अतिसूक्ष्म आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता तो मानवी शरीरात शिरतो, राहतो आणि निघूनही जातो. बरेचदा शरीरावर त्याची कोणती लक्षणेही दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे अस्तित्व ओळखून त्याला रोखणे जवळजवळ अशक्य होते.

भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन केले. मात्र, त्यामुळे देशवासियांना असह्य वेदनांना सामोरे जावे लागेल, हे लक्षात घेतले गेले नाही. शेक्सपिअरच्या भाषेत सांगायचे तर, भले करण्याच्या उद्देशाने ते क्रूर झाले. या सगळ्या प्रक्रियेत क्रौर्याचे अत्यंत रौद्र रूप दृश्य झाले. मर्यादित काळासाठी लादलेली निष्क्रियता आणि कैद यांमध्ये दयेचा अंश होता की नाही, हे अवघ्या वर्षभरातच आपल्याला समजेल. कदाचित या सगळ्यामुळे आपण खूप काही गमावून बसलो आहोत आणि हातात फार काही आलेले नाही, असाही या प्रक्रियेचा निष्कर्ष असू शकेल.

लॉकडाऊन करण्याची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.

‘कोव्हिड-१९’ या साथीच्या दृष्टीने पाहिले, तर जीवनाच्या नाण्याला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, अस्तित्व राखण्यासाठी जगणे गरजेचे आहे. दुसरे म्हणजे, शरीर आणि मनाचे संतुलन राहील, याची काळजी घेणे आवश्यक आहे. साधारणतः या दोन्ही गोष्टी शक्य होण्यात अडचण नसते; परंतु ‘कोव्हिड-१९’ मुळे मानवावर कठीण परिस्थिती ओढवली आहे. सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे होणाऱ्या भेटीगाठींमधून विषाणूच्या फैलावाला चालना मिळते. मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याचा धोकाही निर्माण होतो; परंतु निष्क्रियता आणि विलगीकरणामुळे लोकांची आर्थिकदृष्ट्या जगण्याची क्षमता संपते. दीर्घकालीन विचार केला, तर विशेषतः गरीबांचा एक तर संसर्गामुळे मृत्यू होतो अथवा भुकेने.

त्यामुळे सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असा आहे, की विलगीकरण किती व किती काळ करावे लागेल आणि नेहमीसारखे सक्रीय होण्याचा धोका किती मर्यादेपर्यंत पत्करावा लागेल? याचे प्राथमिक उत्तर म्हणजे विलगीकरण फार काळाचे नसावे. ते अधिक काळ सुरू राहिले, तर ते देशाला आणि नागरिकांना शक्तिहिन करते. दुसरी गोष्ट म्हणजे, ल़ॉकडाऊनमध्ये विषाणूला लांब ठेवले, तरी लॉकडाऊन उठवला, की लगेचच वेगाने फैलाव होण्यास सुरुवात होईल. या विषाणूला रोखले, तरी तो हल्ला करण्यात तरबेज आहे. लॉकडाऊनमुळे विषाणू पूर्णपणे पराभूत होऊ शकत नाही, हे स्पष्टपणे कळत होतेच, आता असे म्हणण्यासाठी आपल्याकडे पुरेसा पुरावाही आहे.

साथीचे जागतिक केंद्र बनलेल्या चीनमधील वुहान या शहरात लॉकडाऊन उठवल्यानंतर महिन्याभरात म्हणजे, ११ मे रोजी पुन्हा संसर्गाचे रुग्ण आढळले. त्यामुळे ही साथ पुन्हा मोठ्या प्रमाणात डोके वर काढू शकते, अशी चिंता निर्माण झाली आहे. दक्षिण कोरियानेही विषाणूशी कसा लढा द्यायचा, हे दाखवून दिले आणि सुरुवातीच्या टप्प्यात विषाणूच्या फैलावावर नियंत्रण आणण्यात यश मिळवले होते; परंतु आज पुन्हा त्यांनी बचावात्मक पवित्रा घेतला आहे. त्या देशात १० मे रोजी महिन्याभरातील उच्चांकी रुग्णसंख्या नोंदविली गेल्यावर, सरकारने बार आणि क्लबांवर बंदी आणली. भारतातील लॉकडाऊन हा चीनसारखा क्रूर मात्र, परिणामकारक नाही की दक्षिण कोरियासारखा नागरी व्यवस्थापनात कुशलही नाही. त्यामुळे भारतामध्ये लॉकडाऊननंतरच्या काळात काही वेगळे परिणाम समोर येतील, असा विचार करण्याचे कारण नाही.

Similar questions