लॉकडाऊन काळात जडलेले छंद निबंध
Answers
Answer:
फोटो स्रोत,GETTY IMAGES
जून महिन्यातली गोष्ट. घरातली सकाळची गडबड चालू होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. मी काहीतरी कामात असल्याने तो उचलला नाही आणि दोनच मिनिटांतच फोन पुन्हा खणखणला. हात धुऊन मी फोन उचलायला बाहेर आले, तर तो माझ्या एका मित्राचा फोन होता. जवळजवळ चार-पाच महिन्यांनी!
आमचं बोलणं सुरू झालं. नेहमी एकदम आनंदी, उत्साही आणि happy-go-lucky असणारा तो, आज काहीतरी वेगळाच वाटत होता. मी जरा खोदून विचारल्यावर त्याने खरं काय ते सांगितलं. "अगं, खरंतर मला तुझ्याशी बोलायची जरा गरज वाटतेय. गेल्या महिनाभर मला चिंता (Anxiety) होते आहे. मला भीती पण खूप वाटतेय. मला कोरोना झाला तरी ठीक. पण माझ्या लहान मुलीला, बायकोला माझ्यामुळे झाला तर? सारखे हे असे विचार येत आहेत. काय करावं कळत नाहीये. प्लीज मला मदत कर."
आपल्यापैकी अनेकांना या कोव्हिडच्या काळात असे काही अनुभव आले असतील. आपलं मन अनेक नव्या समस्यांतून जात असल्याची जाणीव सुद्धा आपल्याला