लॉकडाऊन वर गोष्ट लिहा मराठीत
Answers
Explanation:
सगळं जग ठप्प झालंय. काहीच दिवसांपूर्वी लोकांनी गजबजलेली आणि घड्याळ्याच्या काट्यावर जगणाऱ्या शहरात शुकशुकाट झाला आहे. जगण्यावरच निर्बंध आलेयत...शाळा बंद, प्रवासावर निर्बंध, जमावाने एकत्र येण्यावर बंदी...काही ठिकाणी तर सारंच 'लॉकडाऊन'
सगळ्या जगाने या आजाराला तोंड द्यायला ही पावलं उचलली आहेत. पण हे सगळं संपणार कधी? आपलं आयुष्य पूर्वपदावर कधी येणार?
भारतात लॉकडाऊनचे आता किमान सात आठवडे झाले आहेत आणि पुढचे काही महिने ही साथ कायम राहील, असं स्पष्ट दिसतंय. ही साथ पूर्णपणे जायला बराच वेळ लागणार आहे...कदाचित काही वर्षं.
पण मग लॉकडाऊन कधी उठणार?
कोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी बेसिक रिप्रॉडक्शन नंबर, म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. याला याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट - 0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)