लोकराजा शाहू महाराज यांच्या विषयी 20 ते 25 माहिती लिहा..
Answers
◆◆'लोकराजा शाहू महाराज' यांच्याबद्दल माहिती'◆◆
●छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म कोल्हापुरमध्ये २६ जून, १८७४ रोजी झाला होता.
● त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंघराव अप्पासाहेब घाटगे आणि आईचे नाव राधाबाई होते.
● ते कोल्हापुर राज्याचे पहिले महाराज होते.
● त्यांचा विवाह लक्ष्मीबाई खानविलकर सोबत झाला होता.
● त्यांना दोन मुले आणि दोन मुली होत्या.
● त्यांनी राजकोटच्या, राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षण घेतले होते.
● त्यांना कुश्ती फार आवडत असे.
● ज्योतिबा फुले यांच्याशी ते खूप प्रभावित होते.
● ते एक थोर समाजसुधारक होते.
● महाराज असताना त्यांनी त्यांच्या साम्राज्यात अनेक सामाजिक सुधारणांची सुरुवात केली.
● जातीच्या नावावर भेदभाव न करता सगळ्यांना शिक्षण मिळावे, असे त्यांना वाटायचे.
● त्यांनी मागासवर्गीय जातीच्या व गरीब विद्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्या सुरू केल्या.
● त्यांना समाजाच्या सगळ्या जातींच्या लोकांमध्ये समानता आणायची होती.
● अस्पृश्यता व जातीभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
● त्यांनी आंतरजातीय विवाहला कायदेशीर ठरवले व दलितांच्या उत्थानासाठी खूप प्रयत्न केले.
● त्यांनी बालविवाह रोकण्यासाठी व विधवा पुनर्विवाहसाठी आटोकात प्रयत्न केला.
● महिला शिक्षणासाठी त्यांनी शाळा सुरु केल्या.
● त्यांनी सरकारी नोकरीत अस्पृश्यांसाठी आरक्षण व्यवस्था सुरु केली.
● सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये त्यांनी आणलेल्या बदलांमुळे त्यांना 'राजर्षी' ही उपाधी देण्यात आली.
● दुर्दैवाने ६ मे, १९२२ रोजी त्यांचे मृत्यु झाले.
Answer:
आजवर वेगवेगळे राजे आणि त्यांच्या राजवटी यांची माहिती आपण घेतलेली आहे. पण एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस म्हणजे इ. स. १८९४ मध्ये कोल्हापूरला लाभलेला हा राजा अगदी जगावेगळा होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत क्षण न् क्षण वेचला तो लोकांसाठी - आपल्या प्रजेसाठी, म्हणून तर त्यांचा उल्लेख करतात - 'लोकराजा छत्रपती शाहू महाराज !'
छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जुलै १८७४ रोजी झाला. इ. स. १८९४ साली म्हणजे वयाच्या केवळ विसाव्या वर्षी त्यांनी संस्थानाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून त्यांच्या जीवनाचा, कार्याचा हेतू उद्देश एकच होता... आणि तो म्हणजे समाज परिवर्तन घडवणे. सामाजिक समतेसाठी, मानवी प्रतिष्ठेसाठी आणि गरिबांना विकासाची समान संधी मिळावी यासाठी शाहू महाराज यांनी हयातभर प्रयत्न केला. राजा असूनही त्यांनी वैभवाचा हव्यास धरला नाही. महाराजांचा बंगला असून महाराज सोनतळी कॅम्पमधील एका पत्र्याच्या शेडवजा घरात राहत. त्या घरात लाकडी बाजेवर एक प्रचंड मोठी गादी आणि घोंगडी हा या राजाचा बिछाना. समाजातील जो वर्ग नाडला-पिडला गेला होता त्यांना समाजव्यवहारात त्यांचा हिस्सा मिळावा म्हणून राजे शाहू महाराज झटले.
त्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानांत अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. शिवाय गरीब लोकांच्या हितासाठी जे हुकूम, आदेश ते काढत, त्याची अंमलबजावणी होते की नाही, हे ते स्वतः जातीने तपासत. बहुजन समाजाची सर्वांगीण प्रगती व्हायला हवी असेल, तर त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, हे राजांनी ओळखले होते. म्हणून राजांनी सोनतळी कॅम्पवर भटक्या- विमुक्तांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. हे भटके लोक स्थिर व्हावे म्हणून या राजाने आपल्या राज्यात विहिरी खणणे, घरकुले बांधणे अशी अनेक कामे सुरू केली. खाजगीतल्या पहाऱ्याचे काम पारध्यांवर सोपवले. प्रेमाने जग जिंकता येते, असा या राजाचा विश्वास होता.
शाहू महाराजांनी १९२० साली वेठबिगारीची पद्धत बंद केली आणि महार समाजाला गुलामगिरीतून पूर्ण मुक्त केले. या लोकराजाने महात्मा फुलेंचा सामाजिक समतेचा संघर्ष पुढे नेला. आपल्या मनातले हे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरच पुढे नेऊ शकतील, हे महाराजांनी ओळखले होते आणि तेच त्यांनी या आपल्या अशिक्षित प्रजाजनांच्या मनावर ठसवले. आपल्या लोककल्याणाच्या कार्यात सतत बुडालेल्या या राजाला १९२२ मध्ये अकालीच मृत्यू आला.