लोकसंख्येच्या वितरनावर परिणाम करणारे अनुकुल घटक -
Answers
Answer:
भूगोलात मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियाचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोल हा भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे. मानवी भूगोलाच्या एका शाखेत लोकसंख्येचा अभ्यास केला जातो, त्या शाखेस ‘लोकसंख्या भूगोल’ असे म्हटले जाते. लोकसंख्या भूगोलात लोकसंखेच्या ① गुणात्मक व संख्यात्मक रचनेचा ② लोकसंखेचा अर्थव्यवस्थेवर होणारा परीणाम ③ प्रादेशीक विकास अशा मुद्दयांचा अभ्यास प्रामुख्याने होतो. येथे आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यासणार आहोत.
● लोकसंख्या वितरण- जागतिक लोकसंख्येचे वितरण हे असमान आहे. म्हणजेच जगात सर्व प्रदेशात लोकसंख्या सारख्या प्रमाणात राहत नाहीत. ते खालील आकृतींच्या सहाय्याने समजावुन घेवू.
वरील आकृतींचे निरीक्षण करुन उत्तरे दया.
1) कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात कमी आहे- ऑस्ट्रेलिया
2) भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबतीत कमी असलेला खंड- ऑस्ट्रेलिया
3) ) भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड- (आशिया)
4) कोणत्या विभाजीत वर्तुळात एक खंड कमी आहे व का?- लोकसंख्या वितरण दर्शविणाऱ्या खंडात अंटार्क्टिका खंड कमी असुन तेथे कायम (स्थायीक) वास्तव्य करणारी लोकसंख्या नाही.
● आशिया खंडाची भूमी 30% तर त्यावर 60% लोकसंख्या राहते.
● आफ्रिका खंडाची भूमी 20% असुन तेथे जगाच्या तुलनेत 17% लोकसंख्या वास्तव्य करते.
● जगाच्या तुलनेत उत्तर व दक्षिण अमेरिका खंडमिळून 28% भूक्षेत्र आहे तर येथे केवळ 18% लोकसंख्या आहे.
● युरोपखंडाचे भूमीक्षेत्र जगाच्या तुलनेत 7% असुन तेथे जगातील 5% लोक राहतात.
● ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% असुन तेथे जगाच्या तुलनेत 1% सुध्दा लोकसख्या नाही.
● अंटार्क्टिका खंडाची भूमी 9% असुन तेथे स्थायिक लोकसंख्याच नाही.
● लोकसंख्येची घनता- एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण यावरुन लोकसंख्येची घनता काढता येते. लोसख्येची घनता म्हणजे दर चौ.किमी प्रदेशात राहणारी लोकांची संख्या होय. ती पुढील सुत्राच्या सहाय्याने मिळविता येते.