Political Science, asked by Kasegavkar, 3 months ago

१) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात ?​

Answers

Answered by HotIndians
2

Answer:

लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. ... प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात.

सदस्य: ५५२ (५५० निर्वाचित + २ नियुक्त)

प्रकार: कनिष्ठ सभागृह

सार्वत्रिक निवडणुकाद्वारे लोकसभेच्या सदस्यांची निवड केली जाते. लोकसभेच्या निवडणुका या दर पाच वर्षांनी होतात. लोकसभा निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघाची आखणी करण्यात येते.काहीवेळा पाच वर्षांची मुदत संपण्यापूर्वीच निवडणुका घेण्याची वेळ येऊ शकते. पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधी ज्या निवडणुका घ्याव्या लागतात त्यांना मध्यावधी निवडणुका म्हणून संबोधले जाते. अनेक वेळा अनेक कारणांनी मुदतीच्या आधी लोकसभा विसर्जित झाल्याची बरीच उदाहरणे आहेत. मात्र असे अपवादात्मकच आहे.

Thank you!!!

Pls make me brianlist na

Similar questions