History, asked by ashokawate195, 5 days ago

लोकसभेच्या अध्यक्षांची कामे लिहा.#​

Answers

Answered by dheepikarameshkumar
40

Answer:

भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो. लोकसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची व शिस्त राखण्याची जबाबदारी सभापतीवर असते. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरते निलंबित करण्याचा हक्क देखील अध्यक्षाला आहे. लोकसभा सभापती लोकसभेपुढे अनेक विधायके व ठराव मांडतो व त्यावर चर्चा व मतदान घडवून आणतो.

Explanation:

Similar questions