History, asked by devdhe, 1 year ago

लोकशाही चे चार स्तंभ कोणते​

Answers

Answered by Anonymous
2

Explanation:

शाळेत नागरिक शास्त्रात ‘लोकशाहीला म्हणे तीन स्तंभ असतात’ अस होत. एक लोकसभा-विधिमंडळ, दुसरा न्यायपालिका, तिसरा प्रशासन आणि जो मान्यताप्राप्त नसलेला पण आहे असा चौथा माध्यमे. पण वाटतं का यापैकी कोणी आहे? सगळेच ‘स्तंभ’ आहे की पोटापाण्याचा धंदा? याच उत्तर शेंबड पोरगही देईल. लोकसभा ज्याला हिंदीत ‘संसद’ म्हणतात. मागील महिन्यात बिनबोभाट एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि त्याने आमच्या सर्व खासदारांचे वेतन सोळा हजारावरून ऐशीं हजार झाले. कोणत्याही खासदाराला काहीच वाटले नाही. आणि कोणताही खासदार या विरोधात काही बोलला देखील नाही. आणि ना कोणता पक्ष या विरोधात गेला. हा आहे आपल्या लोकशाहीचा पहिला स्तंभ, ज्यावर आपली लोकशाही टिकली आहे.

दुसरी न्यायपालिका, आता ही ‘न्याय’ नावाची गोष्ट फक्त गोष्टीतच वाचायला मिळते. न्यायपालिकेचा नेमका उपयोग काय तेच कळत नाही. कारण जर कोणाला फाशी केली की ती फाशी आमच्या आजी रद्द करतात. मध्यंतरीच पाच व्यक्तींना ठार करणाऱ्या नराधमावर आमच्या आजीला ‘दया’ आली. कसाबला ‘फाशी’ची शिक्षा झाली. पण अंमलबजावणी होणार नाही याची आता सगळ्यांनाच खात्री आहे. कारण अजून गुरूला फाशी करावी की नाही हा आमच्या ‘प्रशासनाला’ म्हणजेच तिसऱ्या स्तंभाला पडलेला यक्षप्रश्न आहे. ती गोष्ट माहिती आहे ना त्या ‘यक्षाच्या प्रश्नांची’.

आता तिसरा स्तंभ हा ‘प्रशासन’. मालेगावात दंगली होतात. भिवंडीत पोलिसांना ठार मारले जाते. पण त्यावर आमचे प्रशासन काहीच करत नाही. तिकडे नक्षलवादी रोज दहावीस पोलीस, जवान आणि लोकांना ठार मारतात. त्यावर प्रशासन नुसतीच चर्चा करते. मुंबईत पाकने दोनशे लोक मारले. आणि आमचे संरक्षणमंत्री ‘आम्ही हल्ला वगैरे करणार नाही’ अस बोलतात. तो गृहमंत्री दोन महिन्यांपूर्वी पाकचे शेण खाऊन आला. आता काल तो परराष्ट्रमंत्री खायला गेला आहे. आता हा असा तिसरा स्तंभ. गेल्या पंधरा वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा दोन लाख झाला आहे. आणि आमचा महान कृषिमंत्री काय म्हणतात ‘जाणता लाजा’ निर्लज्जपणे क्रिकेटच्या विकासाच्या गोष्टी करतो. खानच्या चित्रपटाची काळजी त्या ढोल्या माकडाला. पण बेळगावच्या प्रश्नात ‘विनंती’. तोच नाही तर आमची शिवसेना, मनसे देखील तशीच. काय म्हणे कायदा पालन करणार. राजीनामे द्या की ‘माकडांनो’. असा आमचा तिसरा स्तंभ.

चौथा स्तंभ काय तर ‘न्यूज इफेक्ट’. साले, कमांडो कुठल्या मार्गे कशे येत आहेत याचे ‘लाईव्ह’ दाखवणारे हे. कोणाच्या घरात कोणी आत्महत्या झाली की हे त्याच्या कुटुंबियांना ‘आता कसं वाटत?’ अस विचारणार. दुसऱ्याच्या मद्यावरील लोणी खाणारी ही कुत्र्याची जमात. माफ करा, पण यापेक्षा चांगली भाषा या चार स्तंभावर मला बोलता येणार नाही. मनात खूप राग वाढतो या चार स्तंभांचा विचार केला की. आणि विशेषतः ह्या चौथ्या स्तंभावर. पाऊस पडला तरी यांची ब्रेकिंग न्यूज नाही पडला तरीही ब्रेकिंग न्यूज. त्या राहुलबाबाने दोन घमेले उचलले की बातमी, आणि कुठे तोंड मारायला गेला तरी बातमी. कसल्या लोकशाहीच्या आणि चार स्तंभाच्या गोष्टी करतो आहोत आपण? ही लोकाशीची चार स्तंब नसून ‘नितंब’ आहेत. ज्याची सगळी घाण आपल्याला सहन करावी लागते. इथे लोकांना पाणी नाही, वीज तर कधी होती? रस्ते कधीही पाहायला मिळाली नाही. पण म्हणे आम्ही विकसनशील राष्ट्र आहोत. त्या हिटलरच्या काळात म्हणे खूप हत्या झाल्या. जरा आकडे शोधा किती त्याने ठार मारले. आणि जरा पाकच्या रोजच्या दहशदवादी हल्यात मेलेल्यांची मोजदाद करा. पहा कोण जास्त क्रूर होते. आणि त्याहून क्रूर ही ‘चार स्तंभे’. जे यावर पोट भरतात.

Similar questions