लोकशाहीचे प्रकार स्पष्ट करा.
Answers
प्रामुख्याने लोकशाहीचे पुढील दोन प्रकार पडतात.
१) प्रत्यक्ष लोकशाही.
२) अप्रत्यक्ष लोकशाही/प्रतिनिधिक लोकशाही.
अप्रत्यक्ष लोकशाहीचे दोन उपप्रकार पडतात.
अ) संसदीय लोकशाही.
ब) अध्यक्षीय लोकशाही.
लोकशाहीच्या उपरोक्त प्रकाराचा पुढीलप्रमाणे थोडक्यात विचार करता येईल.
प्रत्यक्ष लोकशाही : प्रत्यक्ष लोकशाही ही एक अशी शासन पद्धती आहे की जेथे राज्याच्या
कारभारात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. प्राचीन काळात ग्रीक नगरराज्यात अशी लोकशाही असल्याचे पुरावे आढळतात. ग्रीक नगरराज्याची लोकसंख्या आणि क्षेत्र हे मर्यादित होते. म्हणूनअशी शासनपद्धी शक्य डाली असावी. ग्रीक नगरराज्यात सर्व नागरिक एकत्र बसून त्यांच्या राज्याच्या संबंधित विषयांवर चर्चा करून निर्णय घेत असत.
प्रत्यक्ष लोकशाही ही शासन पद्धती चांगली असली तरी ही लोकशाही पद्धती मर्यादित
लोकमया आणि मर्यादित क्षेत्र असलेल्या राज्यासाठीच योग्य आहे. सद्य:स्थितीत ही लोकशाही ।दत अमलात आणणे अत्यंत कठीण कार्य आहे.
अप्रत्यक्ष लोकशाही या लोकशाही पद्धतीत जनता प्रत्यक्षपणे राज्यकारभारात सहभाग
नोंदवत नाही, तर जनता आपत्यातन काही प्रतिनिधींची निवड करून देते आणि निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेच्या वतीने राज्यकारभार पाहतात. जनता आपल्यातून प्रतिनिधी निवड़न देत असल्याने या लोकशाही पद्धतीला प्रातिनिधिक स्वरुपाची लोकशाही पद्धती म्हणूनही संबोधले जाते. या लोकशाही पद्धतीचे, अ- संसदीय लोकशाही व ब- अध्यक्षीय लोकशाही, हे दोन प्रकार आहेत. या प्रकाराचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे थोडक्यात करता येईल.
संसदीय लोकशाही : संसदीय लोकशाही पद्धती ही महत्वपूर्ण अशी लोकशाही पद्धती मानली जाते. या लोकशाही पद्धतीत दोन कार्यकारी प्रमुख असतात. हे प्रमुख म्हणजे एक राष्ट्रपती व दुसरा पंतप्रधान होय. राष्ट्रपती हा नामधारी असतो. प्रत्यक्ष सता ही पंतप्रधान
व त्यांच्या मंत्रिमंडळाकडे असते. सर्व मंत्री हे कायदे मंडळाचे सदस्य असतात. जनतेने
निवडून दिलेले सदस्य मंत्र्यांची निवड करतात. म्हणून मंत्रिमंडळ हे जनतेचे प्रतिनिधी
असतात. आपल्या देशात संसदीय/प्रातिनिधिक स्वरुपाची लोकशाही आहे.
अध्यक्षीय लोकशाही : या लोकशाही पद्धतीमध्ये अभ्यर हाच शासन प्रमुख व राष्ट्रप्रमुख
असतो. ही शासन पद्धती सध्या अमेरिकेत अस्तित्वात आहे.