History, asked by sarthakkadam888, 1 month ago

लोकशाही चे स्वरूप स्पष्ट करा​

Answers

Answered by chetanagawande2006
1

Answer:

प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. लोकशाही हा डिमॉक्रसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. त्याची इंग्रजी व्युत्पत्तिकोशात डिमॉस (Demos) + क्रसी (Cracy) अशी फोड केली असून त्यांचा अनुक्रमे ‘सामान्य लोक’ व ‘सत्ता’ असा अर्थ दिला आहे.हा शब्द डिमॉस + क्रॅटोस (Demos + Kratos) या ग्रीक शब्दापासून झालेला असून त्याचे लॅटिन रूप डिमॉक्रॅशिया असे आढळते. या संज्ञेचा स्पष्ट अर्थ आणि संकल्पनेची काटेकोर व्याख्या, हे अद्यापि विद्वानांत विवाद्य विषय आहेत. अनेक आधुनिक विचारवंतांनी ‘लोकशाही’ या संकल्पनेची व्याख्या व फोड केलेली आहे. त्यापैकी अब्राहम लिंकन यांची ‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ ही व्याख्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध आहे. लिंकन या संदर्भात पुढे म्हणतात, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही, तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्‌गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते.’ ‘बहुमतांचे राज्य’ असेही लोकशाहीचे वर्णन केले जाते. लोकशाहीचे साक्षात (प्रत्यक्ष) आणि प्रातिनिधिक (अप्रत्यक्ष) लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाही’ हा शब्दप्रयोग सामान्यपणे प्रातिनिधिक लोकशाही या अर्थानेच केला जातो तथापि स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोव देशांतून आजही साक्षात लोकशाहीचा प्रयोग काही प्रमाणात पाहावयास मिळतो. स्वित्झर्लंडमध्ये एकूण तीन हजार कम्यून असून सव्वीस कॅन्टन (घटक प्रदेश) आहेत. त्यांपैकी पाच कॅन्टनमध्ये वर्षातून काही दिवस सर्व नागरिक एकत्र जमतात. यावेळी सर्वच विधेयके चर्चेसाठी जनतेपुढे ठेवण्यात येतात आणि बहुमताने निर्णय घेतात. याशिवाय जनमतपृच्छा आणि उपक्रमाधिकार या प्रकारांनी प्रत्यक्ष लोकशाहीची उपयोजना इतर कॅन्टनमध्ये करण्यात आली आहे. ही पद्धत ऑस्ट्रेलियाच्या संविधानातही नमूद केलेली आहे परंतु तिचा प्रमुख्याने उपयोग संविधान दुरूस्तीच्या संदर्भातच करण्यात येतो.

लोकशाही ही एक जीवन पद्धती आहे. तो एक राज्यघटनेचा व राज्यव्यवस्थेचा प्रकार आहे. सामाजिक जीवनाच्या आवश्यकतेतून−अपरिहार्यतेतून जीवन व्यतीत करण्याच्या ज्या काही विचारप्रणाल्या आणि आचारधर्म प्रसृत झाले, त्यांपैकी लोकशाही ही एक आहे म्हणून समाज आणि संस्कृती यांना उद्देशून लोकशाही या शब्दाचा वापर करणे अर्थपूर्ण ठरते. समाज व संस्कृती यांचे वळण जर लोकशाहीपर नसेल, तर लोकशाही पद्धतीचे संविधान स्वीकारूनही त्या देशात लोकशाही रूजणे व टिकणे अवघड जाते. याउलट, एखाद्या देशात लोकशाही पद्धतीने दीर्घकाळ राज्यकारभार चालू असता, त्या देशातील समाजाला व संस्कृतीला लोकशाही वळण प्राप्त होते. अशा प्रकारे या दोन्हींमधील परस्परसंबंध स्पष्ट करता येतो.

उद्‌गम व विकास : लोकशाहीस काही अंशी पूरक असे प्रयोग प्राचीन ग्रीसमधील नगरराज्यांत, विशेषतः अथेन्समध्ये, इ.स.पू. पाचव्या शतकात झाले. अथेन्समध्ये महत्त्वाचे निर्णय अंमलातआणणारी एक समिती होती. तिचे सभासद व राज्याचे अधिकारी लोकांकडून निवडले जात. न्यायनिवाडासुद्धा सर्व नागरिक एकत्र जमून करीत. मर्यादित लोकसंख्येमुळे साक्षात (प्रत्यक्ष) लोकशाही प्रयोग तत्कालीन काही नगरराज्यांत शक्य झाला. सभागृहातील सभासद महत्त्वाच्या सार्वजनिक विषयांवर चर्चा करीत आणि नंतर मत व्यक्त करीत. प्रत्येक नगरराज्याच्या घटनात्मक प्रगतीचे मूलप्रवाह आणि प्रातिनिधिक स्वरूप पाहिले असता असे दिसते की, या नगरांचे नागरिकत्वकाही थोड्या लोकांपुरतेच मर्यादित होते. स्त्रियांना आणि गुलामांना मतदानाचा अधिकार नव्हता. सर्व पदांवर अर्थातच उच्चकुलीन पुरूषांनाच निवडण्यात येई. त्यामुळे राजकीय अधिकार नसलेले लोक खुद्द नागरिकांपेक्षा कितीतरू पटींनी जास्त होते. या मर्यादा लक्षात घेऊनही

Similar questions