लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.( सकारण स्पष्ट करा)
Answers
hope it helps you
लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.( सकारण स्पष्ट करा)
उत्तर :- लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते, कारण
चळवळ म्हणजे एखादी समस्या सोडविण्यासाठी सातत्याने कृतिशील राहून व लोकांना संघटित करून सरकारवर दबाव आणला जातो. चळवळींमध्ये खंबीर नेतृत्त्वाची गरज असते. आपल्या भारतात वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय चळवळी आहेत. जसे कि, आदिवासी चळवळ, शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, स्त्री-चळवळ,पर्यावरण चळवळ, ग्राहक चळवळ इत्यादी. चळवळी या नागरिकांच्या सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात व सार्वजनिक हितासाठी आणि प्रश्नांच्या सोडुणनकीसाठी चळवळी होत असतात. सार्वजनिक प्रश्नांच्या निराकरणासाठी अनेक लोक एकत्र येऊन सामूहिक आंदोलन करतात. सामाजिक प्रश्नांसंबंधी सर्व माहिती आंदोलन करणारे कार्यकर्ते शासनाला देतात. चळवळींमुळे शासनाला त्यांच्या प्रश्नांची दाखल हि घ्यावीच लागते. शासनाच्या निर्णयांना, धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी काम करतात. सरकारवर दबाव आणून आपले प्रश्न सोडविण्यासाठीच चळवळी होतात असे नाही. तर शासनाच्या काही निर्णयांना व धोरणांना विरोध करण्यासाठी चळवळी होतात. लोकशाही पद्धतीत जनतेला प्रतिकार करण्याचा हक्क असतो, म्हणून लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असते.