India Languages, asked by virus6195, 11 months ago

लोकशाहीस+बाधा+निर्माण+करणारे+घटक+कोणते?

Answers

Answered by bakanmanibalamudha
5

Explanation:

लोकशाहीत राजकीय पक्ष महत्वाचे आहेत. राजकीय पक्षाचे दोन प्रकार पडतात. अ)राजकीय पक्ष. ब)राष्ट्रीय पक्ष. लोकशाही : प्रौढ मताधिकाराच्या आधारे, खुल्या व निःपक्षपाती निवडणुकांद्वारा लोकांनी निवणुकांद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे चालणारे राज्य. लोकशाही हा डिमॉक्रसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द. त्याची इंग्रजी व्युत्पत्तिकोशात डिमॉस (Demos) + क्रसी (Cracy) अशी फोड केली असून त्यांचा अनुक्रमे ‘सामान्य लोक’ व ‘सत्ता’ असा अर्थ दिला आहे.हा शब्द डिमॉस + क्रॅटोस (Demos + Kratos) या ग्रीक शब्दापासून झालेला असून त्याचे लॅटिन रूप डिमॉक्रॅशिया असे आढळते. या संज्ञेचा स्पष्ट अर्थ आणि संकल्पनेची काटेकोर व्याख्या, हे अद्यापि विद्वानांत विवाद्य विषय आहेत. अनेक आधुनिक विचारवंतांनी ‘लोकशाही’ या संकल्पनेची व्याख्या व फोड केलेली आहे. त्यापैकी अब्राहम लिंकन यांची ‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ ही व्याख्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध आहे. लिंकन या संदर्भात पुढे म्हणतात, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही, तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्‌गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते.’ ‘बहुमतांचे राज्य’ असेही लोकशाहीचे वर्णन केले जाते. लोकशाहीचे साक्षात (प्रत्यक्ष) आणि प्रातिनिधिक (अप्रत्यक्ष) लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामान्यतः मानले जातात. आधुनिक काळात ‘लोकशाही’ हा शब्दप्रयोग सामान्यपणे प्रातिनिधिक लोकशाही या अर्थानेच केला जातो तथापि स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोव देशांतून आजही साक्षात लोकशाहीचा प्रयोग काही प्रमाणात पाहावयास मिळतो. स्वित्झर्लंडमध्ये एकूण तीन हजार कम्यून असून सव्वीस कॅन्टन (घटक प्रदेश) आहेत. त्यांपैकी पाच कॅन्टनमध्ये वर्षातून काही दिवस सर्व नागरिक एकत्र जमतात. यावेळी सर्वच विधेयके चर्चेसाठी जनतेपुढे ठेवण्यात येतात आणि बहुमताने निर्णय घेतात. याशिवाय जनमतपृच्छा आणि उपक्रमाधिकार या प्रकारांनी प्रत्यक्ष लोकशाहीची उपयोजना इतर कॅन्टनमध्ये करण्यात आली आहे. ही पद्धत ऑस्ट्रेलियाच्या संविधानातही नमूद केलेली आहे परंतु तिचा प्रमुख्याने उपयोग संविधान दुरूस्तीच्या संदर्भातच करण्यात येतो.

Similar questions