'लाखाच्या कोटिच्या गप्पा या पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले ते लिहा
Answers
सुरुवातीला ते दोघेजण काका-पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. सुरुवाती सुरुवातीला ते दोघेजण काका-पुतण्याच आहेत, असे मला वाटले. इतकेच नव्हे तर त्या दोघांचे बोलणे मला खरेच वाटले. पुतण्या शिक्षणासाठी इंग्लंडला जाऊ पाहत आहे आणि श्रीमंत काका त्याला संपूर्ण मदत देऊ पाहत आहेत. काकांबद्दल आदर वाटू लागला. पुतण्याला मात्र पैशांची फारशी किंमत नसावी, असे वाटू लागले. पुढे मात्र लाखो-कोटींच्या गप्पा पटेनाशा होतात. त्यातही विशेष म्हणजे दहा कोटी, ऐंशी लाख, चाळीस तोळ्यांचे सोन्याचे दागिने इतक्या गोष्टी प्रवासातल्या बॅगेमध्ये मावणे शक्यच नाही. कोणताही शहाणा माणूस इतके पैसे व दागदागिने अशा प्रकारे रेल्वेप्रवासात घेऊन जाणे शक्यच नाही. त्यामुळे सगळे खोटे वाटले. लोकांची केवळ गंमत करावी, म्हणून ते अशा गप्पा मारीत असावेत, असे वाटू लागले. पण शेवटी सत्याचा उलगडा होतो.