लोखंडाच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे
Answers
Answer:
लोखंड हे धातुरूप मूलद्रव्यांपैकी सर्वांत उपयुक्त असून त्याची विपुलता ॲल्युमिनियमाच्या खालोखाल म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची आहे. अशनींचा (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचलेल्या पृथ्वीबाहेरील पदार्थांचा) अपवाद सोडल्यास ते मूलद्रव्यरूपात विरळाच आढळते पण भूकवचात रासयनिक संयुगांच्या रूपात ते विपुल प्रमाणात आढळते. लोखंडाची सापेक्षत: कमी किंमत व ते मूलभूत घटक असलेल्या अनेक मिश्रधातू (मुख्यत्वे पोलादे) यांमुळे व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या सर्व धातूंमये लोखंड ही सर्वांत विस्तृत प्रमाणात वापरण्यात येणारी धातू आहे. मूलद्रव्य वा पोलाद यारूपात लोखंडाचा हत्यारे, यंत्रसामग्री, वाहने, अनेक प्रकारच्या वस्तू व मोठ्या प्रमाणावरील बांधकामातील अधिकांश सांरचनिक घटक म्हणून मानवी संस्कृतीत उपयोग झालेला आहे. एखाद्या देशातील लोखंड व पोलाद यांच्या उत्पादनाचे प्रमाण हे त्याच्या औद्योगिकीरणाचे द्योतक समजले जाते. जागतिक धातू उत्पादनातील लोखंड व पोलाद यांचा वाटा सु. ९५.७% आहे. उच्च जीवनमान प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशात उच्च उत्पादमक्षम पोलाद उद्योग वाढत्या प्रमाणात आवश्यक झालेला आहे. प्रगत अर्थव्यवस्था टिकविण्यासाठी लागणाऱ्या पोलादाच्या हजारो वस्तू पुरविण्याकरिता आणि संरक्षणासाठी जहाजे, विमाने, जमिनीवरील वाहने, शस्त्रास्त्रे व इतर सामग्री पुरविण्याकरिता या उद्योगाची अत्यंत गरज आहे.
Answer:
लोखंड उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो.
Explanation:
वर्ष २०१९ च्या आकडेवारीनुसार लोह खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले पहिले दहा देश पुढील प्रमाणे आहेत.
१. ऑस्ट्रेलिया
२. ब्राझील
३. चीन
४. भारत
५. रशिया
६. दक्षिण आफ्रिका
७. युक्रेन
८. कॅनडा
९. अमेरिका
१०. कझाकीस्तान
भारतात लोह खनिजाचे साठे छत्तीसगड, ओडिसा, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र झारखंड या राज्यांमध्ये सापडतात. भारताच्या एकूण लोहखनिजाच्या साठ यांपैकी २० टक्के साठे महाराष्ट्र या राज्यात सापडतात.