*(१) लेखिकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात
लिहा.
Answers
Answered by
5
लेखिकांनी मराठी भाषेचा केलेला सन्मान खालील प्रकारे केला.
- मराठी भाषेला लेखिकांनी श्रीमंत म्हटले आहे . मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो की माझी मराठी श्रीमंत आहे.
- माझ्या भाषेकडे बारकाईने पाहिले तर माझ्या भाषेची खासियत आहे विविध ढंगांचे शब्दप्रयोग करणे. एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो.
- एक साधे क्रिया पद आहे " चालणे " प्रत्यक्ष पायांनी चालणे किंवा अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात . उदाहरणार्थ , नोटा-नाणी चालणे, लुटूलुटू चालणे, एखादे तत्त्व चालणे, लबाडी चालणे, एखाद्या रितीनुसार चालणे,घड्याळ चालणे वगैरे वगैरे, अशी किती वाक्य आहे. माझ्या भाषेचा खास गोडवा आहे.
- मराठी भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वत:च्या हृदयात सामावून घेतले आहेत, याचा अर्थ आहे की माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत आहे.
#SPJ2
Similar questions