लाख कशी तयार करतात
Answers
Answer:
Sorry I m sanskrit student..
Explanation:
लाखेरी; हिं.खेसरी, कसारी; गु. लांग; सं. सदिका (त्रिपुटी); इं. चिकलिंग-व्हाइट-व्हेच, ग्रास पी; लॅ. लॅथिरस सॅटिव्हस; कुल-लेग्युमिनोजी. फुलझाडांपैकी वनस्पति, आवृतबीज उपविभाग वाटाण्याच्या कुलातील व उपकुलातील ही नाजूक वेल मूळची द. यूरोप व प. आशिया येथील असून भारत, इराण, मध्यपूर्व, द. यूरोप व द. अमेरिका येथे पिकविली जाते. एक वर्षायू (एक वर्षभर जगणारे) तण म्हणूनही या वनस्पतीचा भारतभर प्रसार आहे. खोड सु. १. मी. उंच व त्यावर प्रत्येक पेऱ्यावर एक लांबट हिरव्या उपपर्णांची (पानाच्या तळाशी असलेल्या उपांगांची) जोडी व एक संयुक्त पिसासारखे पान असते; पानाच्या टोकाची दोन दले प्रतानरूप (तणाव्यासारखी) व इतर रेषाकृती–भाल्यासारखी असतात.
लाख : (१) फांदी, (२) उपपर्णे, (३) पान, (४) दले, (५) प्रतान, (६) फूल, (७) शिंबा, (८) बिया.
फुले द्विलिंगी एकाकी पानांच्या बगलेत, लालसर, जांभळी, निळी अथवा पांढरी अशा रंगांची भिन्न प्रकारांत आढळतात; फुलाची संरचना पतंगरूप फूल असते (अगस्ता, गोकर्ण इत्यादींप्रमाणे); केसरदले ९ + १ असतात. इतर सामान्य लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (शिंबावंत कुलात) आणि पॅपिलिऑनेटी उपकुलात (पलाश उपकुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. फळे (शिंबा किंवा शेंगा) चपटी २·५–३·८ सेंमी. लांब. काहीशी वाकडी व तडकणारी असून त्यांत ४–५ तपकिरी किंवा पिवळट, बहुधा ठिपकेदार व वाटाण्यापेक्षा लहान साधारण त्रिकोणी बिया असतात. बियांची डाळ खाद्य असून सोयाबीनच्या खालोखाल पौष्टिक आहे; परंतु सतत खाण्यामुळे पायाला असाध्य पक्षाघाताचा विकार जडतो. मनुष्याप्रमाणे जनावरांनाही हा विकार जडतो. होमिओपॅथिक औषधात ही वापरतात; प्लायवुडाचे तक्ते चिकटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोंदात लाखेच्या बियांची पूड वापरतात. बियांचे तेल जहाल विरेचक असते. वनस्पति, विषारी.