History, asked by AmishaKhetwal1406, 9 days ago

लेखकाच्या घरची ढाळज म्हणजे त्यांच्या गावच वर्तमानपत्र हे विधान पटवून द्या

Answers

Answered by hanamant82kamble
16

Explanation:

*(१) आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होतं, या

वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

उत्तर : आगळ' या कादंबरीच्या नायकाची आजी ही त्याच्या

घराची सत्ताधीश होती. घरात तिचा वचक होता. घराबाहेरही तिच्या

शब्दाला मान होता. दुपारपर्यंतच्या सर्व कामांचे नियोजन करून

आजी ढाळजेत यायची. गल्लीतल्या बायकाही जमा व्हायच्या.

निवडटिपण करता करता गप्पाटप्पा व्हायच्या. अनेक बातम्या, गुपिते

उघड व्हायची. सगळ्याजणी बातम्यांवर चर्चा करीत. त्यातून

बातम्यांची शहानिशा व्हायची.

वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांतून बातम्या आणतात. संपादक या

बातम्यांची शहानिशा करतात. मगच त्या बातम्या वर्तमानपत्रात

छापल्या जातात. आजीच्या घराची ढाळज वर्तमानपत्रासारखीच होती.

तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा झाल्यावरच बायका त्या बातम्या

गावभर सांगायला मोकळ्या होत.

Answered by madhukarahire687
0

Answer:

abcd

Explanation:

  • ABCD 222

Similar questions