लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रयत्यांचे घरटे-वारंवार पाहिल्यामुळेपारव्याचे जोडपेहळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
Answers
Answered by
7
Answer:
पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी मोक्याची जागा निवडतात. माणसाप्रमाणेच पक्ष्यांनादेखील एकांत प्रिय असतो. तसेच, धोक्यापासून सुरक्षितता हादेखील त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. अशा वेळेस जर कुणीही त्यांच्या शांततेचा, एकांताचा वारंवार भंग केला, तर पक्ष्यांना असुरक्षितता जाणवते. अशा वेळेस राहण्याची जागा सोडून जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो, म्हणूनच आपण पक्ष्यांच्या शांतताप्रियतेचा विचार करून त्यांना त्रास देऊ नये, ही गोष्ट मला वरील घटनेवरून जाणवली.
Similar questions