India Languages, asked by SuyashSD38, 1 month ago

लेखकाने साधनांशिवाय चित्रकलेची साधना कशी केली?

Answers

Answered by mukundpandav4
1

Explanation:

इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस अशक्य ते शक्य करू शकतो, फक्त त्याच्या आतील इच्छाशक्ती प्रबळ असली पाहिजे. उदाहरणार्थ : परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून काही ट्युशन व क्लास लावण्याची गरज नाही. कोणत्याही विद्यार्थ्याने वर्गात शिकवतानाच लक्ष देऊन जर तो भाग, विषय समजून घेतला आणि स्वत: अभ्यास करून परीक्षेची तयारी केली तर त्यास चांगले गुण मिळू शकतात. फक्त त्याच्या मनात अभ्यास, सराव, पाठांतर करण्याची प्रबळ इच्छा हवी.

एखादया मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवण्यासाठी काही प्रशिक्षण घेण्याचीच गरज नसते. ती कला आपल्या बोटात उपजतच असते फक्त तिला ओळखून प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की थोर मूर्तीकार कोणत्याही मूर्तीकलेच्या शाळेत न जाता त्यांच्या हातून चांगल्या प्रतीच्या मूर्ती घडल्या गेल्या आहेत. म्हणून मनात तीव्र इच्छा असेल तर कोणत्याही साधनांशिवाय कलेची साधना आपणांस करता येते असे म्हणता येईल

Similar questions