लेखक शिवराज गोर्ले यांनी शरीर व मन यांना जोडणारा सेतू याला म्हटले आहे
Answers
Answer:
संक्षिप्त मीनाटयलेखनचित्रपटसाहित्यप्रेरक साहित्यतुम्ही बदलू शकताजीवनसूत्रेस्वातंत्र्यवादउपक्रम
संक्षिप्त मी संपर्क विशेष लघुपट
ज्येष्ठ साहित्तिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते गौरव
‘कशासाठी जगायचं?’ हा प्रश्न फक्त ‘माणसा’ लाच पडतो. म्हणूनच तर तो जगणं अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करतो. माझ्यापुरतं तरी या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट होतं – स्वतःच्या आनंदासाठी जगायचं! म्हणून समर्पणाचे धडे देणाऱ्या ‘ज्ञान प्रबोधिनी’ या संस्थेतून मी बाहेर पडलो आणि एम. ए. (अर्थशास्त्र), एम. बी. ए. करून ‘कॉर्पोरेट करियर’ सुरु केलं. पण तरीही स्वच्छंदी मन नोकरीत रमत नव्हतं. आत एक ‘लेखक’ दडून बसला होता! तशातच ‘आयन रॅन्ड’ या अमेरिकन लेखिकेची ‘दि फाउन्टनहेड’ ही कादंबरी हाती आली. तिनं म्हटलं होतं, ‘तुम्ही स्वतःच्या सर्वात आवडीचं काम करत नसाल तर लक्षात ठेवा – आयुष्यभर स्वतःचा छळ करणार आहात’.
मी स्वतःचा छळ थांबवला आणि ‘पूर्ण वेळ लेखक’ होण्याचा निर्णय घेतला. पाश्चात्य देशात असतात असे ‘पूर्ण वेळ लेखक,’ मायबोलीत विरळाच. मी झालो खरा. चागली २५ वर्षे झाली की! काय लिहीलं मी? काय नाही लिहीलं, विचारा!
नाटक, चित्रपट, टीव्ही सिरिअल, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ ... ‘टोटल’ सगळं लिहीलं. ते कमी म्हणून की काय मराठीत ‘प्रेरक साहित्या’चं नवं दालनच खुलं केलं.
विनोद आणि विचार ही माणसाची दोन व्यवच्छदेक लक्षणं आहेत. इतर प्राणी थोडाबहुत विचार करू शकतात – विनोद नाही करत! मी भरपूर विनोदी लिहीलं. नाटक आणि चित्रपटांनी उभ्या (आणि आडव्या) महाराष्ट्राला... लक्षावधि रसिकांना वर्षानुवर्षे हसवण्याचं ‘पुण्य’ जोडलं. ‘नग आणि नमुने’ लिहून ‘पुलं नंतरही मराठीतला (आणि मराठी माणसातला) विनोद संपलेला नाही, हे सिध्द केलं. हो...नाही कशाला म्हणू? शिवाय...शंतनुराव किर्लोस्कर यांच्यावर आधारित उद्योजकाला नायक बनविणारी मराठीतली पहिली कादंबरी लिहीली. माझ्या मते कुठल्याही समाजात उद्योजकतेला पर्याय नाहीच! सुजाण स्वार्थ, स्वातंच्य आणि स्वाभिमान – या माझा लाडक्या तत्वांचा शक्य तिथे अविष्कार साधला. आणि होय – आनंदाचा अधिकार अधोरेखित करणाऱ्या ‘मजेत जगावं कसं?’. या पुस्तकानं तर इतिहासच घडवला.
एक पुस्तक आयुष्य बदलू शकतं, हा मी स्वतः घेतलेला अनुभव आता माझ्या एका पुस्तकानं हजारो वाचक घेत आहेत, हे माझं भाग्यच मानतो मी. त्यात तरुणाई आहे, हेही विशेष! ‘मराठी कोण वाचतंय?’ या प्रश्नाला मी माझ्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात वाचन हे साधन आहे... आनंद हे साध्य! आनंदानं जगावं... जग सुंदर करावं, इतकी साधी सोपी साद आहे माझी! आता तुमचा प्रतिसाद हवा आहे.
गोर्ले यांच्यावरील विशेष लघुपट 'आनंदयात्री'