Hindi, asked by panditriya13, 5 months ago

लेखक वाईला कशाचे अध्यक्ष म्हणून गेले.*​

Answers

Answered by semore015
6

साहित्य समीक्षक होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या अंकांचे वाचन करून आठ खंडांचे संपादन करणारे साक्षेपी संपादन, सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते.

वडिलांच्या बदलीमुळे रा.ग. जाधव यांचे कुटुंब पुण्याला आले. पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे ११ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठी विश्वकोश प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी जाधव वाई येथे गेले. दोन दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. मे. पुं. रेगे यांच्या निधनानंतर २००० ते २००२ या कालावधीसाठी ते विश्वकोशाचे मुख्य संपादक झाले.

पत्‍नीच्या निधनानंतर १९९०च्या सुमारास प्रा. जाधव पुण्यामध्ये वास्तव्यास आले. सुरुवातीला काही काळ रमणबाग प्रशालेजवळील राजीव लॉज येथे राहिल्यानंतर ते सदाशिव पेठेतील अनपट बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेले. २००४ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गच्चीवरील त्यांच्या छोटय़ाशा पत्र्याच्या खोलीतील घराविषयी चर्चा झाली होती. पुणे महापालिकेने त्यांना घर देण्यासंदर्भात ठराव संमत केला होता. मात्र त्याला जाधव यांनी नम्रपणे नकार दिल्यानंतर ‘साधना’चे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मिळविलेला पाच लाख रुपयांचा निधी आणि जाधव यांच्याजवळची रक्कम एकत्रित करून शनिवार पेठेमध्ये साधना ट्रस्टच्या नावाने जाधव यांच्यासाठी छोटीशी सदनिका घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दाभोलकर यांनी जाधव यांना साधना ट्रस्टमध्ये विश्वस्त करून घेतले. ग.प्र. प्रधान यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन केले.

I hope that this is right answer so please marke as a brainlist and please follow me also

have a nice day

be happy always dear

Answered by karanchoudhary8454
0

Answer:

लेखक वाईला विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून गेले होते.

Similar questions