India Languages, asked by madhurivijay75, 9 months ago

लेखन कौशल्यः
& Marks
(1). प्रसंग लेखन
खालील मुददयांच्या आधारे जोत घालवलेल्या एक दिवसाधा तुम्ही सिनेमा अनुभव तुमच्या शब्दात लिहा
जत्रेतील एक दिवस
आनंददायी वातावरण
लोकांची गर्दी
विविध प्रकारची दुकाने
खेळणी, खादयपदार्य
लहान मुले हटा
मोठी माणसे लगबग(धाई)
देवदाशना
खरेदी​

Answers

Answered by gauri13757
1

Answer:

शिर्षक-मी पाहिलेली जत्रा .....

अखेर चित्र पूर्वीचा दिवस उजाडला. पहाटे दूरूनच सनईचे मंगल सूर कानी येत होते. त्यात नगराचा मंद ठेका घुमत होता. मंजुळ घंटा नाद वातावरणात गुंजत होता. वाऱ्याला अंबानीचा दूरवर सुटला होता ! सारे वातावरण मंगलमय झाले होते. अशा पवित्र वातावरणात मी व माझा आतेभाऊ जत्रेमध्ये फेरफटका मारायला निघालो.

रंगरंगोटी करून सजवलेले देवालय आपल्या भक्तजनांच्या स्वागतासाठी तयार होते. दीप माळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश प्रभातीच्या धूसर वातावरणात दूरवर पसरला होता. गावातील युवकांनी देवालय आणि त्याचा परिसर रंगबिरंगी फुले फुलांनी व पताकांनी आणि माळ यांनी सुशोभित केला होता. दिवस जसा जसा पुढे सरकू लागला, कशी कशी जत्रा चौरंग आणि उत्साहाने फुलत गेली.

देवळाच्या परिसरात विविध दुकानाच्या राहुट्या पडल्या होत्या. देवीच्या ओटी साठी खण, नारळ, फुले, हळद-कुंकू विकणारी दुकाने व प्रसादाची विविध पदार्थ असणारी मिठाई ची दुकाने देवालयाच्या परिसरात उभी केली होती. स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे इत्यादींची अनेक दुकाने रांगेत मांडलेली होती. काही दुकानातून विविध प्रकारची खेळणी आकर्षण पणे मांडून ठेवलेली होती. कुटुंब कल्याण, हिवताप निर्मूलन याची माहिती देणारी सरकारी दालनेही जत्रेत दिसत होती. देवालयाच्या डाव्या बाजूला गुरांचा बाजार भरला होता. त्याला लागूनच शेतीची अवजारे, कांबळी, खते, कोंबड्या व त्याचा आहार याचीही काही दुकाने मांडलेली होती. देवीचे दर्शन घेऊन येणारे गावकरी या साऱ्या दुकानात डोकावत होते; आवश्यक वस्तू खरेदी करत होते. काही कुडमुडे ज्योतिषी आपले नशीब आजमावत बसले होते.( मित्रांनो हा विनोदाचा भाग झाला) दुसऱ्यांना भाग्योदय सांगताना त्यांचे भाग्य मात्र फडफडते.

बालकाच्या आनंदात भर घालणारे फिरते पाळणे, गोल फिरणारी चक्रे व हॉटेलही जत्रेत होती. एका बाजूला लाल मातीत रंगले होते. देवीच्या साक्षीने गावकरी हा सारा आनंद मनमुराद पणे लुटत होते साऱ्या जत्रेतून संध्याकाळ होईपर्यंत आम्ही मनमुराद भटकलो. भूक-तहान तर सहज विसरून गेलो होतो. पुढच्या वर्षी जत्रेला येण्याचा संकल्प सोडून मी घराकडे परतू लागलो.

Explanation:

hope this will help you..

Similar questions