लेखनशैलीमुळे त्या लेखकाचे काय लक्षात येते?
Answers
Answer:
प्रसंगाप्रसंगाने झाले. ते संपादकांनी सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने आकर्षक झाले आहे. ‘गेले लिहायचे राहून’ हा स्तंभ ‘महाराष्ट्र टाइम्स’ (नाशिक) मध्ये काही काळ प्रसिद्ध होत होता. विनायकदादा हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या व्यक्तिमत्त्वास लोकनेते, प्रयोगशील शेतकरी, उत्तम वक्ते, लोकसंग्राहक, साहित्य-संस्कृतीचा चाहता, गाण्यांच्या मैफली अनुभवलेला रसिक, चित्रशिल्प आदी कलांचा चाहता असे अनेक पैलू आहेत. लोकांनीच त्यांना ‘दादा’ ही उपाधी दिली. ते आजन्म काँग्रेस पक्षात आहेत. पण त्यांच्याजवळ सर्वपक्ष समभावही आहे. ते समाजवाद्यांचे, साम्यवाद्यांचे मित्र आहेत आणि त्यांना संघ-जनसंघ परका नाही. पाटील यांच्या वृक्षाची एक फांदी भाजपच्या राजकारणातही सक्रिय आहे. त्यांचे बंधू सुरेशदादा हे भाजपचे नेते आहेत. विनायकदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांना जवळून अनुभवले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले नाहीत पण त्यांचा व शरद पवारांचा दोस्तानाही सुटलेला नाही. ते पवारांच्या ‘पुलोद’च्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. विनायकदादा पाटील यांनी नाशिक लोकसभाही लढवली आहे - ते पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे उमेदवार होते. ते त्यांना तेथे यशाने हुलकावणी दिल्यावर निवडणुकीच्या राजकारणापासून दूर गेले. काँग्रेस पक्षाने त्यांना विधान परिषदेत पाठवले. त्या काळातील घटना, प्रसंग, माणसे यांचे चित्रण ‘गेले लिहायचे राहून’मध्ये वाचण्यास मिळते.
पुस्तकाचे विभाग चार आहेत. ‘स्मरणांकित’ या भागात आठवणी विविध आहेत. त्या आठवणी व्यक्तिगत असल्या तरी त्यांना फार मोठा अवकाश आहे. त्या खुमासदारही आहेत. ‘तिकिट’ आणि ‘पहिले प्रेम’ हे अल्पाक्षरी लेख. बालपणाच्या अनुभवातील निरागसपणा त्या लेखांतून डोकावतो. लेखकाने ‘श्यामची आई’ सिनेमाचे तिकिट हरवल्यावर झालेल्या स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे, “त्यानंतर अनेक वेळा विधानसभा, विधानपरिषद, लोकसभेची तिकिटे मिळाली. ती आता आठवतही नाहीत. पण कोणा अनोळखी माणसाने मायेपोटी दिलेले ‘ते’ तिकिट आजही आठवते.” सूचक भाषा हे विनायकदादा पाटील यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य पुस्तक वाचताना लक्षात येते. तसेच गोधडीविषयीचे पहिले प्रेम लेखकाने विनासंकोच मांडले आहे. गोधडी ही मध्यमवर्गाच्या आणि विकसित कृषक समाजाच्या घरातून नाहीशी झाली आहे. ती तिन्ही ऋतूंत ऊब देते. ते तिचे वैशिष्ट्य लेखकाने अधोरेखित केले आहे. ‘स्मरणांकित’मध्ये अठ्ठावीस लेखांचा समावेश आहे. ते बहुतांश अल्पाक्षरी आहेत. ‘धडा’, ‘गुरूजी’, ‘लाडू मेथीचे’, ‘देवाघरची लेकरे’, ‘पैल तोगे काऊ…’ ही लेखांची शीर्षकेच बोलकी आहेत. त्यांतील ‘पंपा सरोवर’ आणि ‘ब्राह्मण’ हे लेख गमतीदार आणि तेवढेच चिंतनशीलही आहेत. विनायकदादा पाटील यांनी पंपा सरोवराची लोककथा थेट स्थानिकांच्या लोकभाषेत सांगितली आहे! ब्रह्मगिरीच्या पश्चिमेला असलेले कुशेगाव हीच वाली व सुग्रीव यांची राजधानी किष्किंधा नगरी अशी आदिवासींची श्रद्धा असल्याचे स्पष्ट करून तेथील पंपा सरोवराची कथा त्या लेखात येते. ‘रामा, आरे तू येवढा मोठा राजा. म्या तुहयावालं काय केलं व्हतं रं? आमचं भावाभावाचं भांडान. तू काही मागंपुढं पाहयाचं, काही इचारपूस करायची त दिला बान ठिऊन. काय तं म्हणे सुग्र्या तुला शितामाईला गवसायला सोबत करणार हाये म्हून.’ विनायकदादा पाटील यांनी रामायणातील वाली वधाची ही कथा लोकरामायणातील असावी तशीच आदिवासी बाबाच्या तोंडून कथन केली आहे. ती वाचण्यास मजा येते आणि रामाला मर्यादा पुरुषोत्तम का म्हटले जाते त्याचेही आकलन वाचकाला होते. लेखकाने गावात ब्राह्मण हवा ही आईची श्रद्धा आणि त्यासाठी काढलेला मार्ग याची हकिगत ‘ब्राह्मण’ या लेखात सांगितली आहे. त्या आठवणींना साहित्यमूल्य लेखनशैलीमुळे मिळाले आहे.