Science, asked by SANAM2582, 1 year ago

lake tapping म्हणजे काय? ते का केले जाते?

Answers

Answered by tanmaybhere100
54

महाराष्ट्राचा विकास व्हायचा असेल तर तो कृषी आणि औद्योगिक विकासातूनच होईल. त्यासाठी कृषी विकासासाठी आवश्यक असणा-या सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांचा विकास होण्याची गरज असल्याचे मत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांनी मांडले होते.

राज्याचा नियोजनबद्ध औद्योगिक विकास व्हावा यासाठी त्यांनी 1962 मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. अर्थात शेती आणि औद्योगिक विकास व्हायचा असेल तर सर्वाधिक गरज आहे ती विजेची. ही गरज ओळखून कोयना धरणाची उभारणी केली जात होती. 1962 मध्ये बांधकाम पूर्ण  

झालेल्या कोयना धरणाला महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते. या धरणाच्या पाण्यामुळे तयार झालेल्या आणि राज्यातील अनेक लोकांच्या जीवनाला विकासाचा प्रकाश देणा-या या प्रकल्पाने महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीतही मोठे योगदान दिले आहे.

कोयना नदी सह्याद्रीच्या रांगांत उगम पावते. पण ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. कोयना नदी ज्या भागातून वाहत जाते तो भाग अतिपावसाचा आहे. कोयना धरणाचे बांधकाम सुरू असताना इतक्या लहान नदीच्या पात्रावर इतके मोठे धरण कशासाठी बांधले जात आहे, अशी चर्चा होत असते. पण कोयना नदीच्या पात्रात आणि खो-यात पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याची उपलब्धता जास्त आहे. कोयना नदीच्या धरणाची जागा अतिशय आदर्श अशी आहे. कारण कोयनेच्या पश्चिम बाजूस कोकण किनारपट्टी आहे. या किनारपट्टीची समुद्र्रसपाटीपासूनची उंची कमी असल्यामुळे वीजनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असणारी भौगोलिक रचना निसर्गत:च उपलब्ध होती.  

कोयना धरणाची उभारणी प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी केली गेली आहे. पण तरीही या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध केले जाते. धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यात कमी झाला की कोयना धरणातील वीजनिर्मिती ठप्प होत असे. राज्यातील विजेची टंचाई आणि वाढती मागणी याचा मेळ घालण्यासाठी अतिरिक्त आणि अखंडित वीजनिर्मिती करण्याचे आव्हान होते. उन्हाळ्याच्या काळात अखंड वीजनिर्मिती करण्याचे आव्हान आता करण्यात आलेल्या ‘लेक टॅपिंग’मुळे शक्य होणार आहे. कोयना धरणातून सध्या एकूण वीजनिर्मिती 1960 मेगावॅट होते. त्यापैकी एक हजार मेगावॅट वीजनिर्मिती चौथ्या टप्प्यातून होते. पण यासाठी धरणाच्या जलाशयात किमान 630 मीटर पाणीसाठा असणे आवश्यक होते. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील ताकारी, म्हैसाळ, टेंभू यासाठी वीस टीएमसी पाणी मंजूर करण्यात आले होते. पण हे पाणी दिले तर धरणाच्या साठ्यातील पाण्याची पातळी 630 मीटरपेक्षा खाली जाऊन चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मिती बंद पडत असे. दुष्काळी भागाला तर पाणी द्यायचे, पण त्याचबरोबर वीजनिर्मितीतही खंड पडता कामा नये अशा दुहेरी आव्हानाला सामोरे जाण्यासाठी कोयना जलाशयात ‘लेक टपिंग’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ‘लेक टपिंग’ मुळे जलाशयातील पाणीपातळी 618 मीटरवर गेली तरीही वीजनिर्मितीत खंड पडणार नाही. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातही कोयनेतून अखंडित वीज मिळत राहील.

काही कालावधीपूर्वी कृष्णा पाणीवाटपाबाबत बच्छावत लवादाने दिलेल्या निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 25 टीएमसी अतिरिक्त पाणी आले आहे. ‘लेक टॅपिंग’मुळे हे पाणीही वापरता येणे शक्य होणार आहे. कोयनेतून वीजनिर्मिती झाल्यानंतर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. हे पाणी मुंबईकडे वळवता येईल का, असा विचार आता सुरू झाला आहे. भविष्यात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते शक्य झाले तर मुंबईची आणि गतीने विकास होणा-या मुंबईलगतच्या इतर परिसराची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर पूर्ण होईल. कोयना धरणाच्या उभारणीचा यंदा सुवर्णमहोत्सव आहे. या वर्षात कोयना धरणाच्या प्रगतीत ‘लेक टॅपिंग’च्या माध्यमातून आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

‘लेक टॅपिंग’ म्हणजे काय? - कोयना धरणाच्या जलाशयाखाली भूगर्भात साडेचार किलोमीटर लांबीचा बोगदा काढण्यात आला. हा बोगदा आणि धरणाचा जलाशय यांच्यामध्ये असणारा भूपृष्ठाचा थर स्फोटकाच्या साहाय्याने उडवून देण्यात आला. यामुळे जलाशय आणि बोगदा एकमेकांना जोडले गेले. जलाशयातून अतिशय वेगाने पाणी वीजनिर्मिती प्रकल्पापर्यंत नेणे शक्य झाले. त्यामुळे जलाशयातील पाणीपातळी कमी झाली तरी अखंडित वीजनिर्मिती सुरू राहील.  

कोयना जलाशयात यापूर्वी 13 मार्च 1999 रोजी पहिल्यांदा ‘लेक टॅपिंग’ करण्यात आले होते. त्या वेळी बोगद्याची लांबी सुमारे सव्वाचार किलोमीटर होती. त्या वेळी केलेल्या ‘लेक टॅपिंग’ मुळे कोयनेची वीजनिर्मिती करण्याची क्षमता एक हजार मेगावॅटने वाढली होती. या स्फोटासाठी बोनोजेल ही बोफोर्स कंपनीची स्फोटके वापरण्यात आली. या दुस-या टप्प्याच्या ‘लेक टॅपिंग’साठी सुमारे सव्वानऊशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. पण जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी केवळ 540 कोटी रुपयांच्या खर्चात काम पूर्ण केले. हे कामही त्यांनी कमी वेळेतच पूर्ण केले.

Answered by priyarksynergy
2

झील का दोहन:

Explanation:

  • एक झील के नल में लगभग पानी या चट्टान के संपर्क में एक सुरंग खोदना और फिर अंतिम सुरक्षात्मक चट्टान को नष्ट करना शामिल है ताकि पानी अचानक झील से सुरंग में प्रवाहित हो सके।
  • झील का पहला दोहन 13 साल पहले कोयना बांध पर किया गया था। अप्रैल 26, 2012।
  • यह प्रक्रिया झील के पानी को उस सुरंग से नीचे बहने देती है। इस प्रकार की झील का दोहन सबसे पहले एशियाई महाद्वीप में स्थापित किया गया था।
  • झील का दोहन विभिन्न कारणों से किया जाता है:
  • झील के पानी को शुद्ध करना।
  • झील के पानी को कम करना।
  • झील के पानी को पूरी तरह से बाहर निकालना।
Similar questions