Hindi, asked by ninad08, 4 months ago

Letter Writing
शाळेच्या सहलीला जाण्यासाठी वडीलांची परवानगी मागणारे पत्र लिहा.
उत्तर:​

Answers

Answered by Anshu200803
14

दिनांक :-२० सप्टेंबर २०१८

कांदिवली पूर्व

मुंबई

तीर्थरूप बाबांस

चि . मनालीचा शिरसाष्टांग नमस्कार,

तुम्हाला मुद्दाम पत्र लिहिण्यास कारण की, ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आमच्या शाळेची सहल नाशिक येथे जाणार आहे. आमचे वर्गशिक्षक साठे सर या सहलीचे प्रमुख आहेत.माझ्या सर्व मैत्रिणी जाणार आहेत, त्यामुळे मलाही जाण्याचा खुप उत्साह वाटतो आहे .सहलीला आम्ही पंचवटी, सप्तशृंगी ,त्रिंबकेश्वर ,पांडवलेणी हि सारी ठिकाणे पाहणार आहोत.आई मला म्हणाली की बाबांची परवानगी घेऊन जा म्हणून हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे.तुम्ही मला जायला नाही म्हणणार नाही ह्याची खात्री असल्याने मी आधीच नाव देऊन टाकले आहे. सहलीची फी 15०० रूपये आहेबाबा, मी जाऊ ना?

लवकर कळवावे.

तुमची लाडकी मुलगी

Similar questions