लघुगुरू क्रम लावा मराठी grammer
Answers
Explanation:
वृत्त
वृत्त हे कवितारचनेचे एक प्रमाण आहे. भाषा हे आत्मप्रकटीकरणाचे साधन आहे. आपण आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना भाषेद्वारेच व्यक्त करत असतो.
याचे दोन प्रकार आहेत.
१) गद्य
२) पद्य
१) गद्य :-
आपल्या मनात जसे विचार येत जातात ते जसेच्या तसे बोलून दाखविणे. आपल्या या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात.
उदा.
'परमेश्वरा, मी जेथे जाईन, तेथे तू माझ्याबरोबर असतोस.
२) पद्य :-
हे विचार किंवा याच वाक्यातील शब्द काही ठरावीक क्रमाने लिहून ते सुरावर म्हणता येतील. अशा पध्दतीने त्याची रचना केली तर त्याला पद्य असे म्हणतात.
उदा.
'जेथे जातो तेथे, तू माझा सांगाती.
मात्रा :-
एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यास जो कालावधी किंवा वेळ लागतो त्यास ‘मात्रा’ असे म्हणतात.
अक्षरांत –हस्व व दीर्घ असे दोन प्रकारचे उच्चार आहेत. सामान्य भाषेत ज्यांना –हस्व व दीर्घ असे म्हणतात त्यांना पद्याच्या भाषेत ‘लघु – गुरु’ असे म्हणतात.
ऱ्हस्व अक्षर उच्चारायला जो वेळ लागतो; त्यापेक्षा दीर्घ अक्षर उच्चारायला अधिक वेळ लागतो.
अ, इ, उ, ॠ या –हस्व उच्चारल्या जाणा-या स्वरांस किंवा क, कि, कु, कृ यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस ‘गुरु अक्षरे’ असे म्हणतात.
आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या दीर्घ उच्चारल्या जाणा-या स्वरांस किंवा का, की कू, के, कै, को, कौ, यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस ‘गुरु अक्षरे असे म्हणतात.
ऱ्हस्व अक्षराला लघु म्हणतात. ते 'U' या चिन्हाने ओळखतात. त्याची एक मात्रा मोजतात.
दीर्घ अक्षराला गुरु म्हणतात. ते '_' या चिन्हाने ओळखतात. त्याची दोन मात्रा मोजतात.
उदा.
म ना स | ज्ज ना भ | क्ति पं थे | चि जा वे !
U _ _ U _ _ U _ _ U _ _
मात्रा मोजण्याचे नियम