लघु उदयोग म्हणजे काय ?
Answers
Answer:
औद्योगिक धंद्यांचे स्थूलमानाने (१) मोठे उद्योग, (२) मध्यम उद्योग व (३) लघुउद्योग असे वर्गीकरण करतात. अशा वर्गवारीसाठी अनेक गमके सुचविण्यात आली आहेत. गुंतविलेले भांडवल, एकूण रोजगार, उत्पादित मालाची किंमत, त्या उद्योगधंद्यांचे व्यवस्थापकीय स्वरूप ह्यांसारख्या कसोट्यांवर हे वर्गीकरण केले जाते. तथापि गुंतविलेले भांडवल व रोजगार ह्या कसोट्यांनाच प्राधान्य दिले जाते.
लघुउद्योगांची व्याख्या अनेकदा बदलली आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी ३०,००० रु. भांडवल गुंतविलेल्या कारख्यान्यास लघुउद्योग म्हटले जात होते. पंचवार्षिक योजनांच्या प्रारंभी भारत सरकारच्या ‘लघुउद्योग मंडळा’ने पाच लाख रुपयांहून कमी भांडवली गुंतवणूक असलेला व यंत्रशक्ती वापरात असल्यास ५० पेक्षा कमी कामगार असलेला कारखाना, अशी लघुउद्योगाची व्याख्या केली होती. पुढे भांडवल व कामगार या दोन कसोट्यांऐवजी भांडवलाचीच कसोटी लावण्याचा निर्णय घेतला गेला. कालांतराने सतत होत जाणारी भाववाढ लक्षात घेऊन भांडवलाची कमाल मर्यादा वेळोवेळी वाढविण्यात आली. तसेच लघुउद्योगात एक लाख रुपयांहून कमी गुंतवणूक असलेल्या एककांचे अतिलघू असे वर्गीकरण करण्यात आले. १९८० साली जाहीर केलेल्या व नंतर सुधारलेल्या भारत सरकारच्या धोरणाप्रमाणे लघुउद्योगांचे प्रचलित वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे : (१) यंत्रे व कारखाना यांमध्ये दोन लाख रु. हून कमी गुंतवणूक असलेल्या व ५०, ००० हून कमी लोकवस्तीच्या गावी असलेल्या एककांचा ‘अतिलघू विभाग’ (२) ३५ लक्ष रुपयांहून कमी गुंतवणूक असलेल्यांचा ‘लघुविभाग’ आणि (३) अंगभूत उद्योग असल्यास ४५ लक्ष रुपयांहून कमी गुंतवणुकीच्या उद्योगांचा ‘अंगभूत विभाग’. जे उद्योग इतर उत्पादक एककांना यंत्राचे घटक भाग, त्यांच्या उत्पादनासाठी उपजुळवण्या, हत्यारे वा अर्धपक्व माल व त्यांच्या सेवेच्या वा उत्पादनाच्या ५०% मूल्यापर्यंत माल वा सेवा पुरवितात, त्यांचा समावेश अंगभूत उद्योगांत करण्यात आला आहे.
लघुउद्योग ह्या संज्ञेत खास लघुउद्योग व कुटिरोद्योग अशा दोहोंचाही अंतर्भाव होतो. ह्या दोहोतील फरकांची साधारणतः खालील गमके सांगता येतील : (१) कुटिरोद्योगात प्रायः उत्पादनकार्यात यंत्रशक्तीचा व विद्युत्शक्तीचा उपयोग केला जात नाही. परंतु लघुउद्योगांबाबत असे विधान करता येणार नाही. परंपरागत तंत्र वापरून, परंपरागत मालाचे उत्पादन करणारे परंपरागत धंदे असे कुटिरोद्योगांचे वर्णन केले जाते. (२) कुटिरोद्योगांच्या मालाला बाजारपेठ साधारणपणे स्थानिक असते, तर लघुद्योगांची बाजारपेठ अधिक विस्तृत असते. (३) कुटिरोद्योगांत बहुसंख्येने मालकांचे कुटुंबीयच काम करतात व वेतनदार कामगारांची संख्या मर्यादित असते. लघुद्योगांत ह्याच्या उलट परिस्थिती असते. (४) कुटिरोद्योगाला लागणारा कच्चा माल प्रायः स्थानिक बाजारपेठेतच उपलब्ध असतो, तर लघुउद्योगाला लागणाऱ्या कच्च्या मालाची बाजारपेठ इतकी मर्यादित नसते. कुटिरोद्योग व लघुद्योग यांमधील भेद दाखविताना राज्यवित्तीय आयोगाने असे म्हटले आहे की, कुटिरोद्योग सर्वसाधारणतः शेतीशी संलग्न असतात आणि ते ग्रामीण भागात अर्धवेळ व शहरात पूर्णवेळ काम पुरवितात [⟶ कुटिरोद्योग]. लघुद्योग बव्हंशी शहरी विभागात पसरलेले असून ते पूर्णपणे रोजगार उपलब्ध करून देतात. भारताच्या सातव्या पंचवार्षिक योजनेत ग्रामीण उद्योगांचे व लघुउद्योगांचे आठ उपविभाग केले आहेत, ते असे : (१) खादी, (२) कुटिरोद्योग, (३) हातमाग, (४) रेशीम उत्पादन, (५) हस्तव्यवसाय, (६) काथ्या, (७) लघुउद्योग, (८) यंत्रमाग, यांपैकी ७ व ८ यांत आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते व बव्हंशी ते नागरी क्षेत्रात असतात. त्यांच्यात कामगारांना पूर्ण रोजगार मिळतो व त्यांची वाढ पहिल्या सहांपेक्षा वेगाने होते. पहिल्या सहा उपविभागांतील उद्योग पारंपरिक स्वरूपाचे आणि ग्रामीण किंवा अर्धनागरी क्षेत्रातील असतात. त्यांत कामगारांना पूर्ण किंवा कमी वेळ रोजगार मिळू शकतो. त्यांच्यामुळे देशातील शिल्पकौशल्य व सांस्कृतिक कलाकृतींचा वारसा टिकून राहू शकतो.
Explanation:
Mark as brainest
Answer:
cjjfjg ch jfjfjcjcm jfjfjcjcm jfjfjcjcm jfjfjcjcm jfjfjcjcm