ling gunottar mhanje Kay ? answer in Marathi
Answers
Answer:
लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.[२] २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.[३] म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.[३]
लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००
काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८
Explanation:
hope it is helpful please follow add brain list
Answer:
दर हजार पुरुषांमागे लोकसंख्येत असलेले स्त्रियांचे प्रमाण म्हणजे लिंगगुणोत्तर. कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप वजा केला, तर नैसर्गिक रित्या दर १०० मुलींमागे साधारणतः १०४ ते १०७ मुलगे जन्माला येतात. जैविक रित्या लहान मुलगी ही मुलापेक्षा अधिक चिवट असल्याने मुलींच्या प्रमाणातील सुरुवातीची कमतरता जलद गतीने भरून निघणे अपेक्षित असते. मानवी समाजामध्ये लिंग गुणोत्तर हे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मोजले जाते. उदा., जन्माच्या वेळचे गुणोत्तर, तसेच ० – ६, ० – १९, १५ – ४५, ६० + इत्यादी. वेगवेगळ्या वयोगटातील लिंग गुणोत्तराच्या आकडेवारीवरून त्या विशिष्ट वेळेच्या सामाजिक वास्तवांसंधर्भात अंदाज बांधता येतो. लिंग गुणोत्तर हे विकासाचा निर्देशांक म्हणून स्त्रियांच्या समाजातील स्थानाविषयी प्रकाश टाकते.
गर्भ लिंग ओळखण्याचे विज्ञान व तंत्रज्ञान विकासित होण्यापूर्वी नको असलेल्या मुलींची जन्मताच विविध पद्धतींचा वापर करून हत्या केली असे. स्त्री अर्भक हत्त्या किंवा मुलींना दुर्लक्षित करून हे मृत्यू नैसर्गिक कसे आहेत, हे दाखविण्याचे प्रयत्न अनेक कुटुंबांकडून केले जात होते. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री अर्भक हत्येची प्रथा काही समूहांपुरती आणि प्रदेशांपुरती मर्यादित असल्याचे पुरावे इतिहासात सापडतात. इ. स. १७८९ मध्ये ब्रिटिशांना या प्रथेचा पहिल्यांदा शोध लागला आणि इ. स. १८२४ व इ. स. १८२८ मध्ये ब्रिटनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘स्त्री अर्भक हत्या’ विषयक दोन प्रमुख अहवाल त्यांनी सादर केले. इ. स. १८७० मध्ये ब्रिटीश सरकारने स्त्री बालहत्या कायदा अंमलात आणला. या कायद्यांतर्गत गुन्ह्यात सामील असलेल्या व्यक्तींना दोषी ठरवून शिक्षेची तरतूद करण्यात आली; परंतु शिक्षेची अमलबजावणी कठीण होत असल्याने इ. स. १९०६ मध्ये हा कायदा ब्रिटिशांनी रद्द केला. परिणामी इ. स. १९४१ मध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण ९४५ : १००० इतके होते .
मला बुद्धीबळ उत्तर म्हणून चिन्हांकित करा.
मला बुद्धीबळ उत्तर म्हणून चिन्हांकित करा. धन्यवाद .