लक्षावधी वर्षे सूर्याच्या कक्षेत पृथ्वी आपल्याला कुशीत
घेऊन स्वत:भोवती फिरत आहे. आपण माणसे तिच्या पोटात
राहून संसारात मग्न राहतो व जी पृथ्वी आपली आई आहे तिलाच
विसरतो. आपण विमानात असलो किंवा बोटीत असलो तरी
जमिनीवरच उतरावे लागते; मात्र आपण कधीच आपल्या या
भूमातेचे आभार मानत नाही. कृतज्ञता व्यक्त करत नाही. खरंतर
तिच्याशिवाय आपण एक मिनिटही जगू शकणार नाही, म्हणूनच
रोज सकाळी प्रथम आपण आपल्या या आईला वंदन करायला
हवे. दिनांक २१ मार्च हा 'वसुंधरा दिन' आहे. निदान या दिवशी
तरी आपण आपल्या या मातेला साष्टांग नमस्कार केला पाहिजे.
मग ती आनंदी होईल, प्रसन्न होईल व प्रेमभऱ्या हृदयाने अनंत
आशीर्वाद देईल.
Answers
Answered by
0
Answer:
- सदगीतेगी गा हं नं यु जप्पप
Similar questions